Online gambling | काय सांगता ! होय, चक्क बँक मॅनेजरनेच जुगारात उडवले ग्राहकांचे कोट्यावधी रुपये

शिमला : वृत्तसंस्था – Online gambling | पैसे गुंतवणूक करण्याचा अथवा पैसे व्यवस्थित जपून ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे बॅंक असते. ग्राहकांचा बॅंकेवर विश्वास असल्याने ग्राहक छोट्यापासून ते मोठी रक्कम बॅंकेत ठेवत असतो. मागील काही काळामध्ये ऑनलाइन फसवणुकीचे (Online fraud) प्रकरण देखील पाहायला मिळालं. यामध्ये अनेकांना गंडा घातला गेला. दरम्यान, हिमाचल प्रदेशमधील एक अजब आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क एका बॅंकेच्या मॅनेजरनेच ग्राहकांच्या पैशांवर (Online gambling) डल्ला मारला आहे. प्रसूनदीप अत्री (Prasundeep Atri) असं ब्रँच मॅनेजरचं नाव आहे.

प्रसूनदीप अत्री हा ब्रॅंच मॅनेजर ग्राहकांच्या खात्यातील पैसे वापरून ऑनलाईन जुगार (Online gambling) खेळत होता. जुगार जिंकल्यानंतर पुन्हा त्या खात्यांत पैसे टाकत होता. यासर्व प्रकारात त्याने कोट्यावधी रुपयांचे अपहार केले आहेत. तर, कुल्लु जिल्ह्यातील रहिवासी असलेले धरमचंद (Dharamchand) हे पासबुक अपडेट करण्यासाठी हिमाचल ग्रामीण बँकेत (Himachal Gramin Bank) गेले होते. पासबुक अपडेट केल्यानंतर त्याच्या बँक खात्यातून 4 लाख रुपये काढल्याची नंतर पुन्हा जमा केल्याची एंट्री दिसली. किसान क्रेडिट लिमिट सुविधेचा वापर करून हे 4 लाख रुपये काढले होते. या प्रकारावरुन धरमचंद यांनी शाखा व्यवस्थापकाशी (Branch Manager) संपर्क साधला. सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडामुळे पासबुकवर तशी नोंद आल्याचं त्यांनी सांगितलं. पण धरमचंद यांना शंका होतीच. नंतर धरमचंद यांनी आपल्या ओळखीतील लोकांना आपापलं बँक पासबुक अपडेट करण्यास सांगितलं. तेव्हा अनेकांच्या खात्यांत असाच गोंधळ दिसून आला.

Pune Crime | फसवणूक प्रकरण ! अलनेश सोमजीच्या पोलीस कोठडीत वाढ; पत्नी डिंपल सोमजीची येरवडा जेलमध्ये ‘रवानगी’

दरम्यान, त्यानंतर सर्वांनी मिळून बँकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची तक्रार केली. त्यानंतर झालेल्या चौकशीत ब्रँच मॅनेजरंच (Branch Manager) पैशांची अफरातफर करत असल्याचं समोर आलं आहे. या अफरातफर प्रकरणी आरोपी ब्रँच मॅनेजर प्रसूनदीप अत्री याला पोलिसांनी ताब्यात (Arrested) घेतलं आहे. दरम्यान, प्रसूनदीप अत्री हा दीड वर्षांपूर्वी हिमाचलमधील दोहरानाला बँक शाखेत व्यवस्थापक होता. त्याला ऑनलाइन जुगार खेळण्याची आणि शेअर मार्केटमध्ये (Share Market) पैसे गुंतवण्याची सवय होती. सुरुवातीला तो आपल्या पगारातील पैसे गुंतवत राहिला. मात्र, आपल्याकडील पैसे संपल्यानंतर त्याने ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढण्यास सुरुवात केली. तो ठराविक ग्राहकांच्या खात्यांना लक्ष्य करत होता. जे ग्राहक वर्षातून फक्त 2-4 वेळा बँकेत येत असत आणि ज्यांनी बँकेकडून एसएमएस अलर्टची (Bank SMS Alert) सुविधा घेतली नव्हती, अशा खात्यांतून आरोपी पैसे काढत होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर आरोपी राजस्थानला पळून जाण्याच्या तयारीत होता. पंरतु अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

या दरम्यान, या वर्षी आरोपीने 35 लाख 75 हजार रुपयांचा, तर आतापर्यंत एकूण 1कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. सध्या बँकेचं एक पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपी व्यवस्थापकाला निलंबित करण्यात आलं आहे. बँक घोटाळ्याचं प्रकरण समोर आल्यानंतर उर्वरित खातेदारही आपले पासबुक अपडेट करण्यासाठी बँकेत पोहोचले आहेत.

हे देखील वाचा

Nashik-Pune Highway | नाशिक-पुणे महामार्गावरील रस्त्याचं काम अपूर्ण असूनही टोल वसुली; कंपनीला 2 कोटी 18 लाखांचा दंड

Pune Corporation | पुणे महापालिकेची ‘टॉयलेट’ कथा ! ‘मलिदा’ घेऊन बिल्डरच्या फायद्यासाठी 20 लाख रुपये खर्चून उभारलेले ‘स्वछतागृह’ मध्यरात्री ‘जमीनदोस्त’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Online Gambling | branch manager used customer 1 crore money in online gambling jugar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update