फक्‍त ‘हे’ करा आणि मिळवा इन्कम टॅक्स रिफंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इन्कम टॅक्स विभागानं म्हणजेच आयकर विभागाने यावर्षी रिफंड केली जाणाऱ्या रकमेची घोषणा केली जाणार आहे. या आर्थिक वर्षात आयकर विभागाने ६४,७०० करोड रुपये रिफंड रक्कम जाहीर केली आहे. जर तुम्ही इन्वेस्टमेंट डिक्लेरेशनमध्ये कमी रक्कम दाखवली असेल आणि कर वाचवण्यासाठी गुंतवणूक वाढवली असेल. तर जो जास्त टॅक्स तुमच्याकडून घेतला असेल. तो तुम्हाला रिफंडच्या रूपात पुन्हा मिळेल. मात्र आता आयकर विभागाने नियमांत बदल केले आहेत. तुम्हाला आत हा रिफंड थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे आता यामध्ये कुणावरही अन्याय होणार नाही. यासाठी आयकर विभागाने काही नियमांत बदल केले आहेत. मात्र या रिफंडचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पुढील गोष्टी कराव्या लागतील.

३१ जुलैपूर्वी आयकर भरणे

जर तुम्हाला या रिफंडचा लाभ घ्यायचा असेल. तर तुम्हाला ३१ जुलैपूर्वी आयकर भरणे बंधनकारक आहे. त्यामुळे जर तुम्ही ३१ जुलैपूर्वी आयकर भरला तर तुम्हाला या रिफंडचा फायदा घेता येईल. ३१ जुलै २०१९ ही आयकर भरण्याची शेवटची तारीख आहे.

पॅनकार्ड बँक खात्याशी लिंक

तुमचे पॅनकार्ड जर तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तरच तुम्हाला या रिफंडचा फायदा उचलता येईल. तुम्ही तुमच्या बचत खाते, चालू खाते यांपैकी कोणत्याही खात्याला पॅनकार्ड लिंक करू शकता. जर तुम्ही हे केले नसेल. तर आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते लिंक देखील करू शकता.

दरम्यान, यामुळे आयकर भरणाऱ्यांना याचा फायदा मिळेल. या सगळ्या अटी पूर्ण असतील तर रिफंड थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल. याआधी तो चेकद्वारे दिला जात असे

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक