2 कोटी लोकांचा रद्द होऊ शकतो IT रिटर्न, आता ‘या’ पध्दतीनं तपासा, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – आयकर विभागाने 2019-20 या वर्षात 31 ऑगस्टपर्यंत 5.65 कोटी ITR प्राप्त झाल्याचे सांगितले. यात फक्त 3.61 कोटी ITR वेरिफाय आहेत. म्हणजे जवळपास 2 कोटी लोकांनी ITR वेरिफिकेशन केलेले नाही.

१२० दिवसात वेरिफाय करावे लागेल आयटीआर –
आयकर विभागानुसार, आयटीआर दाखल केल्यानंतर १२० दिवसात वेरिफाय करावे लागेल. जर तुम्ही आयटीआर वेरिफाय केले नाही तर ही प्रकिया पूर्ण होणार नाही आणि तुमचा आयटीआर फाइल केली जाणार नाही तसेच तुम्हाला दंड देखील भरावा लागेल. आयटीआर वेरिफिकेशन ही आयटीआर फायलिंगचा टप्पा आहे. जर तुम्ही आयटीआर फाइल केला आणि वेरिफिकेशन झाले नसेल तर तुमच्या आयटीआर फायलिंगचा विचार केला जाणार नाही.

ही आहे वेरिफाय करण्याची लिंक –
आयकर विभागने आयटीआर वेरिफिकेशन करण्यासाठी आपल्या ई फायलिंग पोर्टलवर एक नवीन https://www.incometaxindiaefiling.gov.in/home लिंक सुरु केली आहे. ही लिंक ई वेरिफाय रिटर्न नावाने क्विक सेक्शन मध्ये देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर ई वेरिफिकेशन पेज ओपन होईल. येथे पॅन कार्ड, असेसमेंट ईयर आणि आयटीआर फॉर्म – ५ वर देण्यात आलेल्या पावती नंबरवरील माहिती देऊन आयटीआर वेरिफाय करु शकतात.

या आहेत ITR वेरिफिकेशनच्या पद्धती –
1. आधार OTP च्या माध्यमातून वेरिफिकेशन –
रिटर्न केल्यानंतर तुम्ही आधारच्या OTP माध्यमातून वेरिफाय करु शकतात. यासाठी तुमचा आधार क्रमांक आधारशी जोडलेला आहे. ITR वेरिफायची पद्धत निवडल्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक OTP येईल. याला आयकर विभागाच्या वेबसाइटवर टाकल्यानंतर तुमचा रिटर्न वेरिफाय होईल.

2. नेट बँकिंगच्या माध्यमातून वेरिफिकेशन – नेट बँकिंगच्या माध्यमातून ITR वेरिफिकेशन करण्यासाठी बँकेच्या वेबसाइटवर लॉगइन करावे लागेल. त्यात तुम्हाला ई – वेरिफिकेशनचा पर्याय उपलब्ध असेल. यावर क्लिक केल्यावर ईमेल आणि मोबाइलवर 10 अंकी कोड येईल. हा कोड 72 तासांसाठी वैध असेल. यानंतर ITR वेरिफाय करण्यासाठी माय अकाऊंट टॅबमध्ये जावे लागेल आणि ईवीसी टाका. याला सबमिट केल्यानंतर तुमचे ITR वेरिफाय होईल.

3. बँक खात्याच्या माध्यमातून वेरिफिकेशन –
ही सुविधा प्रत्येक बँक देत नाही. त्यामुळे बँकेत या संबंधित आधी विचारणा करा. त्यात तुम्हाला बँकेचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड आणि मोबाइल नंबर टाकावा लागेल. जर तुमचे पॅन नंबरवरील नाव आणि बँक खात्यावरील नाव जुळले तर तुमचे वॅलिडेशन होईल. त्यानंतर तुम्हाला एक 10 आकडी कोड येईल. याला सबमिट केल्यानंतर तुमचे ITR वेरिफाय होईल.

4. एटीएमच्या माध्यमातून वेरिफिकेशन –
जेव्हा तुम्ही ATM कार्ड मशिनमध्ये टाकालं तेव्हा पिन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला पिन फॉर ई – फायलिंगचा पर्याय देईल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पिन रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर पाठवण्यात येईल. हा कोट 72 तास वैध असेल. यानंतर आयकर विभागाच्या वेबसाइटवर जाऊन ई वेरिफाय पर्यायवर क्लिक करुन त्या हा कोड टाकावा लागेल. यानंतर तुमचे ITR वेरिफाय होईल.

5.अ‍ॅकनॉलेजमेंट पावतीवर स्वाक्षरी करुन पाठवा –
तुम्हाला तुमच्या ई – फायलिंगला 120 दिवसात बेंगळुरु आयकर विभागाच्या सीपीसीमध्ये प्रिंट आणि हस्ताक्षर ITR फॉर्मला पाठवायला लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे वेरिफिकेशन पूर्ण होईल. तुम्हाला यासाठी निळा रंगाच्या पेनानेच स्वाक्षरी करावी लागेल. ही पावती तुम्ही पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून पाठवू शकतात. याबरोबर तुम्हाला कोणतीही कागदपत्र लावण्याची गरज नाही. आयकर विभागाला तुमची पावती मिळाल्यानंतर तुमच्या ई मेलवर किंवा मोबाइलवर एक मेसेज येईल.

आरोग्यविषयक वृत्त –