Online Life Certificate | घरबसल्या ऑनलाइन जमा करू शकता हयातीचा दाखला, बँकिंग अलायन्स देतंय सुविधा

नवी दिल्ली : Online Life Certificate | जर तुम्ही पेन्शनधारक असाल तर तुम्ही 30 नोव्हेंबरपर्यंत लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच हयातीचा दाखला जमा करणे आवश्यक आहे. अनेकदा असे दिसून येते की, पेन्शनधारकांना लाईफ सर्टिफिकेट जमा (Online Life Certificate) करण्यात समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु आता तुम्ही घर बसल्या ऑनलाइन आपले लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकता. हयातीचा दाखला पेन्शनधारक त्यांचा आधार नंबर आणि बायोमेट्रिक्सचा वापर करून जनरेट करू शकतात.

आपला हयातीचा दाखला (DLC) जमा करण्यासाठी, पेन्शनधारकांना पेन्शन वितरण अधिकार्‍यांकडे जाण्याची आवश्यकता नाही.
तो पेन्शन वितरण एजन्सीला डिजिटली किंवा ऑनलाइन पद्धतीने सुद्धा जमा करता येतो. यासोबतच, पेन्शनधारक डोअर स्टेप बँकिंग अलायन्सद्वारे घरबसल्या आपला हयातीचा दाखला जमा करू शकतात. या सुविधेबाबत जाणून घेवूयात…

डोअरस्टेप बँकिंग अलायन्स सुविधा

पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने म्हटले की, पेन्शनधारक 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या डोअरस्टेप
बँकिंग अलायन्स किंवा पोस्ट कार्यालयाच्या डोअरस्टेप सेवेचा वापर करून डिजिटल जीवन प्रमाणपत्र जमा (Online Life Certificate) करू शकता.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाचा समावेश आहे.

अशाप्रकारे घेऊ शकता फायदा

तुम्ही वेबसाइट (doorstepbanks.com, www.dsb.imfast.co.in/doorstep/login), किंवा ‘डोअरस्टेप बँकिंग’
मोबाइल अ‍ॅप्लिकेशन, किंवा टोल-फ्री नंबर (18001213721 किंवा 18001037188) वर कॉल करून बँकेची डोअरस्टेप सेवा बुक करू शकता. (Online Life Certificate)

हे देखील वाचा

Nilofar Malik | नवाब मलिकांची मुलगी निलोफर यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस, माजी मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढणार?

Diabetes Awareness Month 2021 | अनियंत्रित डायबिटीज पोखरू शकते तुमचे संपूर्ण शरीर, ‘या’ 8 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

Gold Price Today | सोने-चांदीच्या दरात आज मोठा फेरबदल, सोने 1000 रूपयांनी स्वस्त तर चांदी 4000 रुपयांनी महाग

Maharashtra Police | राज्यातील 10 परिविक्षाधीनपोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्तांच्या (DySp / ACP) नियुक्त्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Online Life Certificate | online life certificate life certificate can be submitted online sitting at home banking alliance is providing facility for the convenience of pensioners

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update