जर चुकून दुसऱ्याच बँक खात्यात ‘ट्रान्सफर’ झाले ‘ऑनलाइन’ पैसे, तर ‘या’ पद्धतीनं मिळवा परत
पोलीसनामा ऑनलाइन टीम – देशात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिलं जात आहे. डिजिटल पेमेंट सर्व्हिसमुळे ऑनलाईन पेमेंट आणि मनी ट्रान्सफर करणं सोपं झालं आहे. जास्त करून लोक या सुविधेचा वापर करतात. अनेकदा असं होतं की, चुकून तुम्ही एखाद्या दुसऱ्याच अकाऊंटला पैसे ट्रान्सफर करता. काही वेळेस असंही होतं की काहींच्या अकाऊंटमधून चुकून पैसे कापले किंवा काढले जातात. या समस्येचं निराकरण कसं करायचं याची आज आपण माहिती घेणार आहोत.
या वर्षाच्या सुरुवातील एक घटना समोर आली होती. ज्यात एका व्यापाऱ्याची ऑनलाईन फसवणूक झाली होती. त्यावेळी त्या व्यापाऱ्याच्या फोनवर 6 मिस्ड कॉल आले होते. सकाळी त्याने पाहिलं तर त्याच्या अकाऊंटमधून 1.86 कोटी रुपये काढण्यात आले होते.
RBIने बनवला नियम
रिझर्व्ह बँकेनुसार, जर तुमच्या परवानगीशिवाय पैसे काढले गेले असेल तर तुम्ही तीन दिवसांच्या आत बँकेला याची माहिती द्यायला हवी. यानंतर बँक तुमच्या या माहितीचा तपास करते की, तुमचे पैसे चुकीच्या अकाऊंटला ट्रान्सफर झाले आहेत की, चुकीच्या पद्धतीने काढण्यात आले आहेत. तपासानंतर तुमचे सर्व पैसे तुम्हाला परत केले जातात. यासाठी तुम्हाला काही अटींचं आणि प्रकियेचं पालन करावं लागतं.
1) पैसे परत मिळवण्यासाठी तुम्हाला आधी एटीएम कार्ड नंबर आणि इंटरनेट बँकिंग सर्व्हिस बंद करावी लागेल.
2) यानंतर तुम्ही पोलिसांत तक्रार करायला हवी.
3) या FIRची एक कॉपी तुम्हाला बँकेत जमा करावी लागते.
4) बँक या FIRच्या आधारे कापण्यात किंवा काढण्यात आलेल्या पैशांचा तपास बँक करेल.
5) जर तुमच्यासोबत कोणत्याही प्रकारची फसवणूक झाली असेल तर तुम्हाला तुमचे सर्व पैसे परत मिळतात.
6) परंतु जर तुम्ही चुकून एखाद्या अकाऊंटवर पैसे ट्रान्सफर केले असतील तर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील की नाही हे बँकेवर अवलंबून असतं.
7) असे असले तरी तुम्हाला चिंता करण्याचे काही कारण नाही. योग्य पुरावा दिल्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात. यासाठी घटना घडल्यानंतर सर्वात आधी याबाबत तुमच्या बँकेला पूर्ण माहिती द्या.
Visit : Policenama.com
- अचानक ‘गोड’ किंवा ‘जंकफूड’ खाण्याची इच्छा हे ‘टेन्शन’चे लक्षण, जाणून घ्या अन्य लक्षणे
- जास्त ‘प्रोटिन्स’चा होतो ‘किडनी’वर परिणाम, असे ओळखा प्रोटिन्सचे प्रमाण
- भरपूर खा…आणि वजनही ठेवा नियंत्रणात, जाणून घ्या पद्धत
- ‘स्मोकिंग’च्या सवयीने त्रस्त आहात का ? योगा करा आणि सोडवा व्यसन
- कॅटरिनासारखी ‘टॉवेल एक्झरसाइज’ करा आणि ‘स्लीम’ व्हा
- शांत झोप येत नाही का ? मग आहारात ‘हे’ आवश्य घ्या, जाणून घ्या
- चालण्याचे ‘हे’ आहेत ५ मोठे फायदे, तूम्हाला माहित आहेत का ? जाणून घ्या