बँकिंग सेवेचा लाभ घेताना ID आणि पासवर्ड विसरलात तर ‘नो-टेन्शन’, असं करू शकता Login

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपण आपला कोणताही आयडी किंवा पासवर्ड कोणाशी शेअर करत नाही. कारण जर आपण असं केलं तर ते आपल्याला महागात पडू शकतं. परंतु अनेकदा आपण आपला पासवर्ड विसरतो. जर तुम्ही आयडी किंवा पासवर्ड विसरलात तर तुम्ही ऑनलाईन बँकिंग सेवेचा लाभ घेता येत नाही. यासाठीच आता ICICI बँकेनं एक सिस्टीम लाँच केली आहे. याद्वारे तुम्ही लॉगइन करून बँकिंग सुविधेचा लाभ घेऊ शकता.

जर तुम्ही पासवर्ड विसरलात तरीही आता नो टेन्शन. कारण बँकेनं लाँच केलेल्या या सिस्टीममध्ये तुम्ही रजिस्टर मोबाईल नंबर, डेबिट कार्ड पिन आणि ओटीपीच्या सहाय्याने लॉग इन करू शकता. यानंतर तुम्हाला आर्थिक देवाण घेवाण शक्य होईल.

कसा घ्याल या नव्या सिस्टीमचा फायदा ?
1) बँकेची ऑफिशियल वेबसाईट www.icicibank.com वर जा.
2) लॉग इन किंवा नेट बँकिंगच्या पर्यायावर क्लिक करा.
3) इथं तुम्ही बँकेतील तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर एन्टर करा. त्यावर तुम्हाला एक ओटीपी येतो. इथं तुम्हाला ओटीपी आणि डेबिट कार्ड पिन एन्टर करून प्रोसेस करायची आहे.
4) ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही नेट बँकिंग सुविधेचा लाभ घेऊ शकता. जर तुम्ही ऑनलाईन लॉगइन आयडी किंवा पासवर्ड विसरलात तरी या नव्या सिस्टीमद्वारे लॉगइन करून बँकिंग सेवेचा लाभ घेऊ शकता. यामुळे तुमची अडचण दूर होईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/