Google Pay वापरकर्त्यांना मिळणार ‘ही’ नवी सुविधा; पेमेंट करणं अधिक सोपं; जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अधिक सोप्या आणि जलद गतीचा आर्थिक व्यवहार हा Google Pay च्या माध्यमातून होतो. याचा अनेक वापरकर्त्यांना फायदा देखील होतो. Google Pay हे अॅप विविध अपडेट प्लान आणत असतं. मात्र सुरु करण्यासाठी UPI,creadit card, तसेच, लोगो यासारखे अनेक बदल केले होते. तर सध्या एक नवीन अपडेट आणलं आहे. यामध्ये Google Pay आता एनएफसी (NFC) चा वापर करुन पेमेंट सुरू करू शकतं. असे म्हटले आहे.
असं करा NFC द्वारे पेमेंट –
Google Pay लवकरच NFC सुविधा सुरू करू शकणार आहे. असे म्हटलं आहे. तर NFC कॉन्टॅक्टलेस पेमेंट करण्याची परवानगी देत आहे, ज्यामध्ये वापरकर्त्याला कार्ड स्वाईप करण्याची आवश्यकता लागणार नाही. असे नव्या धोरणानुसार सांगण्यात आले आहे. तसेच, सपोर्ट पेजनुसार जेव्हा युजर पेमेंटवर नमूद करेल, त्यावेळी गूगल पे अॅप स्वत:हून सुरु होणार आहे. वापरकर्त्याला पेमेंटची खात्रीपूर्वक करण्यासाठी Proceed वर टॅप करावे लागणार आहे.तर आता फक्त Pine Lab Terminal NFC पर्याय समर्थन करत. तसेच, NFC सक्षम ट्रान्झेक्शन जास्त सहज आणि सुविधाजनक आहे असं म्हटलं आहे. अनेक फिनटेक कंपन्या NFC पेमेंटवर कार्य करत आहेत, कारण हे इंटरनेट कनेक्शन व्यतिरिक्त व्यवहाराची परवानगी देत आहे.
अॅक्सिस बँक –
मार्च महिन्यात Axis Bank ने अशी अनेक योजना सुरू केली होती, जी अनेक ग्राहकांना NFC चा वापर करुन कॉन्टॅक्टलेस पेमेंटची परवानगी देत आहे. यामध्ये रिस्टबँड, कीचेन्सआणि एक लहान डिव्हाईस लूप दिल गेलं होत. हे सगळे डिव्हाईस ग्राहकांच्या बँक खात्याशी जोडले गेले आहेत. आता एक User PIN
न टाकता ५ हजारापर्यंत NFC व्यवहार करू शकणार आहे. या दरम्यान या मर्यादेपेक्षा अधिक ट्रान्झेक्शन करण्यासाठी वापरकर्त्याला त्याचा PIN वापरुन पेमेंट प्रमाणित करण्याची गरज आहे.