Online Portal for Pension Complaint | पेन्शनर्ससाठी सरकारने बनवले पोर्टल ! आता पेन्शनसंबंधी तक्रारी तात्काळ होतील दूर, जाणून घ्या पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेन्शनधारकांसाठी (Pensioners) कामाची बातमी आहे. आता तुम्हाला पेन्शनशी संबंधित समस्यांची काळजी करण्याची गरज नाही. माजी सैनिक आणि त्यांच्या अवलंबितांच्या पेन्शनशी संबंधित समस्यांचे निवारण करण्यासाठी सरकारने एक विशेष ऑनलाइन पोर्टल तयार केले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ’आर्म्ड फोर्सेस वेटरन्स डे’ निमित्त या नवीन पोर्टलची घोषणा केली (Online Portal for Pension Complaint).

 

संरक्षणमंत्र्यांनी दिली माहिती
या विशेष पोर्टलचे नाव ’डिफेन्स पेन्शन तक्रार निवारण पोर्टल’ आहे ज्याद्वारे माजी सैनिक त्यांच्या तक्रारी थेट माजी सैनिक कल्याण विभागात (DESW) नोंदवू शकतात. ट्विटरवर याबाबत माहिती देताना राजनाथ सिंह यांनी लिहिले की, डिफेन्स पेन्शन तक्रार निवारण पोर्टलच्या स्थापनेची घोषणा करताना मला आनंद होत आहे.

 

या पोर्टलचा उद्देश ESM आणि त्यांच्या आश्रितांच्या कौटुंबिक निवृत्ती वेतनाशी संबंधित तक्रारींचे निवारण करणे हा आहे. हे पोर्टल सर्व पेन्शनधारकांना सध्याच्या आणि भविष्यात मदत करेल. एवढेच नाही तर या पोर्टलच्या मदतीने पेन्शनधारकांच्या अवलंबितांच्या तक्रारींचेही निवारण करता येणार आहे. (Online Portal for Pension Complaint)

तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, या विशेष उपक्रमामुळे कुणीही माजी सैनिक या

पोर्टलद्वारे त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतो.

यासाठी माजी सैनिकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकासह या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.

यासाठी सर्वप्रथम या पोर्टलला भेट द्या.

येथे विचारलेली माहिती बरोबर भरा.

आता या पोर्टलवर तुमचा मोबाईल नंबर घेऊन नोंदणी करा.

तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल.

आता तुमचा OTP इथे नोंदवा.

यानंतर, ईमेल-आयडी नोंदणी करा.

आता पोर्टलद्वारे तुमच्या तक्रारीवर सुरू असलेल्या कारवाईची ईमेलवर माहिती देईल.

 

 

Web Title :- Online Portal for Pension Complaint | online portal for pensioners complain inaugurate know how to register defense pension grievance redressal port

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Guru Tara sets and rises 2022 | 19 फेब्रुवारीला कुंभ राशीत होईल गुरुचा अस्त, ‘या’ 8 राशींसाठी धनलाभ आणि यशाचा योग

 

One-Time Pension | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ‘वन-टाइम पेन्शन’ पर्याय ! आता NPS नाही तर OPS अंतर्गत मिळणार, जाणून घ्या

 

Akshay Kumar Wedding Anniversary | लग्नाच्या 21 व्या वाढदिवसानिमित्त अक्षय कुमारने पत्नी ट्विंकल खन्नासाठी लिहिली पोस्ट, म्हणाला…

 

Best Business Ideas | गावातील लोकांनी कमी खर्चात सुरू करावेत हे 7 उद्योग, कमी वेळात होईल मोठी कमाई; जाणून घ्या