SBI ची खास सुविधा ! आता कागदपत्रांशिवाय घरबसल्या काही मिनिटांत उघडा खाते, जाणून घ्या प्रक्रिया
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये बचत खाते उघडणे खूप सोपे झाले आहे. यासाठी कागदपत्रे आवश्यक नाहीत व बँक शाखेेतही जाण्याची गरज नाही. हे काम घरून फक्त 4 मिनिटांत करता येते. एसबीआयने इंस्टा सेव्हिंग बँक खात्याची सुविधा सुरू केली आहे. हे आधार बेस्ड इन्स्टंट डिजिटल सेव्हिंग खाते आहे ज्याद्वारे ग्राहक बँकेच्या इंटिग्रेटेड बँकिंग आणि लाइफस्टाइल प्लॅटफॉर्म योनोद्वारे खाते उघडू शकतात.
या विशेष सुविधा असतील उपलब्ध
एसबीआय इंस्टा सेव्हिंग्ज बँक खातेधारकांना 24 × 7 बँकिंग प्रवेश मिळतो. एसबीआय इन्स्टा सेव्हिंग बँक खात्यातील सर्व नवीन खातेदारांना मूलभूत वैयक्तिक RuPay ATM-cum-डेबिट कार्ड मिळेल. महत्त्वाचे म्हणजे जर त्यात किमान शिल्लक नसेल तर बँक कोणतेही शुल्क आकारणार नाही. एसबीआय इन्स्टा सेव्हिंग बँक खातेदारांसोबत दिवसा 24 तास बँकिंग सुविधा उपलब्ध असेल.
कसे उघडावे खाते :
– एसबीआय इंस्टा सेव्हिंग्ज बँक खाते उघडण्यासाठी ग्राहकांना योनो ॲप डाउनलोड करावा लागेल.
– यानंतर, आपल्या पॅन आणि आधारचा तपशील प्रविष्ट करून ओटीपी सबमिट करत इतर तपशील भरावा लागेल.
– एसबीआय इंस्टा सेव्हिंग्ज बँक खातेदारांसाठी नामनिर्देशन सुविधा देखील उपलब्ध आहे.
– एसएमएस अलर्ट आणि एसबीआय क्विक मिस्ड कॉल सर्व्हिसद्वारे नामनिर्देशन करता येते.
– प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खातेदाराचे खाते त्वरित सक्रिय होईल आणि ते व्यवहार करण्यास सक्षम असतील.
– ग्राहक केवायसी पूर्ण करण्यासाठी एका वर्षात जवळच्या बँक शाखेत भेट देऊ शकतात.