ऑनलाइन लसीकरण नोंदणीमुळे शहरीभागातील नागरिकांकडून ग्रामिण भागातील नागरिकांवर होतोय अन्याय – आमदार अशोक पवार

शिक्रापूर  : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकार covid-19 लसीकरण मोहीम ऑनलाइन ॲप द्वारे राबवली जात आहे यामध्ये कोणताही व्यक्ती नोदणी करुन कुठे जाऊन लस घेउ शकतो त्यामुळे मोठ्या शहरांतील नागरिक रजिस्ट्रेशन करून ग्रामीण भागातील केंद्रांवर लसीकरणासाठी येत असल्याने स्थानिकांना लसीकरणापासुन वंचित रहावे लागत आहे. हा ग्रामीण भागातील नागरिकांना अन्याय आहे. यामुळे ग्रामीण भागातील स्थानिकांना लसीकरणात प्राधान्य द्यावे अशी मागणी शिरूर हवेलीचे आमदार ॲड.अशोक पवार यांनी केली आहे.

केंद्र सरकारने लसीकरणासाठी तयार केलेल्या ॲपमध्ये मोठ्या प्रमाणात चुका दिसुन येत असुन त्यामध्ये सुधारणा करणे गरजे आहे.गावाकडील व्यक्ती नोकरी किंवा व्यवसायानिमित्त मोठ्या शहरांमध्ये गेलेले आहे परंतु त्यांचेकडे गावाकडील पत्त्याचे आधार कार्ड आहे अशा नागरिकांच्या लसीकरणास विरोध नाही. मात्र आधार कार्ड देखील मोठ्या शहरातील असलेले नागरिक ऑनलाईन पध्दतीने रजिस्ट्रेशन करतात आणि लसीकरणासाठी ग्रामीण भागात येतात.

ग्रामीण भागातील अनेक नागरिक अशिक्षित असुन त्यांना ऑनलाईन ॲप वापरता येत नसल्याने व माहिती नसल्यामुळे स्थानिकांना लसीकरणापासुन वंचित रहावे लागत असल्याने त्यांचेवर अन्याय होत आहे.सध्या लसीकरण कमी प्रमाणात होत असुन अशा परिस्थितीत केंद्र सरकारने राज्य सरकारला एक वेगळे ॲप देवुन तालुकानिहाय कोड दिले पाहिजे तसेच स्थानिकांना लसीकरणात प्राधान्य दिल्यास त्यांना न्याय मिळु शकतो याबाबत राज्य सरकार तसेच पालकमंत्री अजित पवार यांना विनंती करून मागणी केली असल्याचे यावेळी बोलताना शिरूर हवेलीचे आमदार ॲड.अशोक पवार यांनी सांगितले