Online Video Game | ‘ऑनलाइन गेम’मूळ आयुष्य गमावलं ! रुळावर बसून खेळत होते ‘गेम’, रेल्वे धडकल्यानं युवकांचे झाले ‘तुकडे-तुकडे’

कोलकाता : Online Video Game | पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगना जिल्ह्यात ऑनलाइन व्हिडिओ गेम (Online Video Game) ने दोन तरूणांचा बळी घेतला आहे. ही दुर्देवी घटना उत्तर 24 परगनाच्या अशोकनगरच्या माणिकनगरमधील कंचनपल्लीमध्ये घडली आहे. दोघे तरूण रेल्वे रूळावर (Rail Line) बसून व्हिडिओ गेम खेळत होते.

त्यांचे लक्ष मोबाइल फोन (Mobile Phone) च्या स्क्रीनवर होते आणि कानात इयरफोन लावले होते. त्याचवेळी ट्रेन आली आणि वारंवार हॉर्न वाजवून सुद्धा त्यांना आवाज ऐकू गेला नाही आणि काही क्षणातच तरूणांच्या चिंधड्या उडाल्या.

स्थानिक जीआरपी सूत्रांनी सांगितले की, दुपारी दोन्ही तरुण रेल्वे रूळावर बसून गेम खेळत होते. कानात ईयरफोन लावले होते. जेणेकरून बाहेरील आवाजाचा त्रास होऊ नये. हे तरूण गेममध्ये इतके गुंग झाले होते की, त्यांना विरूद्ध दिशेने येत असलेल्या ट्रेनची चाहूल देखील लागली नाही. हॉर्नसुद्धा ऐकू गेला नाही आणि रेल्वे रूळावर त्यांचे शरीर छिन्नविछिन्न झाले.

धडापासून शिर झाले वेगळे

रेल्वे पोलिसांनुसार, दोन्ही तरूणांचे शिर धडापासून वेगळे झाले आहे. संपूर्ण शरीराच्या चिंधड्या उडाल्या आहेत.
या तरूणांची ओळख पटू शकलेली नाही. ही घटना ठाकुरनगर मोहल्ल्यात सायंकाळी सात वाजल्यानंतर घडली.
परंतु हे स्पष्ट नाही की, दोन्ही तरूण रेल्वे लाईनवर गेम का खेळत होते. बनगाव पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

हे देखील वाचा

Life Certificate | Pensioner साठी विशेष सुविधा! आता व्हिडिओ कॉलने जमा करू शकता लाईफ सर्टिफिकेट, जाणून घ्या प्रक्रिया

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार ! 2 जाउबाईंनी एकमेकींच्या पतीवर केला ‘डायरेक्ट’ बलात्काराचा आरोप, पहिली म्हणाली ‘गोठ्यात’ तर दुसरीने लॉजमध्ये ‘काम’ दाखवल्याची दिली तक्रार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Online Video Game | online video game snatched 2 lives in bengal playing games sitting on the track youths were torn apart after being cut from the railway

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update