कामाची गोष्ट ! घरबसल्या SBI ATM कार्डला करा Active, जाणून घ्या प्रोसेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही तुमचे एसबीआयचे नवीन एटीएम कार्ड घर बसल्या ऍक्टिवेट करू शकता. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने ग्राहकांना खास सुविधा दिली आहे. एसबीआय ग्राहक आता स्वतः आपल्या कार्डला ऍक्टिव्हेट करू शकणार आहे मात्र यासाठी ग्राहकांकडे नेट बँकिंगची सुविधा असणे गरजेचे आहे. जाणून घेऊयात एटीएम ऍक्टिवेट करण्याची पूर्ण प्रोसेस

अशा प्रकारे ऍक्टिवेट करा आपले ATM कार्ड
एसबीआयचे नवीन एटीएम कार्ड सक्रिय करण्यासाठी ग्राहकास बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.onlinesbi.com वर भेट द्यावी लागेल.

लॉगिन केल्यानंतर ‘e-Services पर्यामध्ये जाऊन ATM Card Services पर्यायावर क्लीक करा.

यानंतर उघडलेल्या सेक्शनमध्ये तुम्ही ज्या खात्यासाठी कार्ड सुरु करत आहेत त्याचा पर्याय निवडा.

यानंतर तुमचा 16 आकडी एटीएम कार्ड क्रमांक दोनवेळा टाका आणि त्यानंतर ऍक्टिव्हेट पर्यायावर क्लीक करा.

खात्याचा प्रकार आणि ब्रांचचे लोकेशन अशा प्रकारची माहिती तपासून नंतर कन्फर्म पर्यायावर क्लिक करा.

यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाइल क्रमांकावर पासवर्ड येईल तो पासवर्ड टाकल्यानंतर कन्फर्म वर क्लिक करा.

तुमचे नवीन एटीएम कार्ड ऍक्टिवेट होईल,तुम्हाला तुमच्या स्क्रिनवर एक मेसेज दिसेल की तुमचे एटीएम कार्ड यशस्वीरीत्या ऍक्टिवेट झाले आहे.

हे कार्ड ऍक्टिव्हेट करताच तुम्ही लगेच वापरू शकता.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like