SBI नं पुन्हा आपल्या कोटयावधी ग्राहकांना केलं अलर्ट ! ‘या’वेळी दिला अ‍ॅप संदर्भात ‘गंभीर’ इशारा, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   देशातील सर्वात मोठीसरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)ने आपल्या ग्राहकांना अ‍ॅपबाबत सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. बँकेने आपल्या ट्विटर हँडलद्वारे याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात एसबीआयने आपल्याला धोकादायक बँकिंग व्हायरसपासून सतर्क केले होते. बँकेने म्हटले आहे की, Cerberus नावाच्या धोकादायक मालवेअरच्या सहाय्याने खातेधारकांना लक्ष्य केले जात आहे. हे मालवेयर बनावट मोठ्या ऑफरबद्दल वापरकर्त्यांना एसएमएस पाठवून माहिती पाठवते आणि अज्ञात लिंकवर क्लिक केल्यावर किंवा अ‍ॅप्स डाउनलोड केल्यानंतर त्यांचा शिकार करते. अशा अ‍ॅप्सचा हेतू खातेधारकांच्या पैशावर हात साफ करणे आहे. बँकेने म्हंटले की, काही मोबाइल अ‍ॅप्स आपला फोन धोक्यात आणू शकतात. कारण हा अ‍ॅप वैयक्तिक माहिती चोरू शकतो.

 

एसबीआयने फोनसाठी दिल्या काही सेफ्टी टिप्स :

   आपल्या मोबाइल फोनमध्ये नेहमी अधिकृत स्थानावरूनच अ‍ॅप डाउनलोड करा, म्हणजेच गूगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल स्टोअर वरून अ‍ॅप डाउनलोड केले जावे.

   अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर परवानगी देताना काळजी घ्या

   कोणत्याही अ‍ॅपमध्ये तुमचा डेबिट आणि क्रेडिट कार्डचा तपशील सेव्ह करु नका

–   अ‍ॅप डाउनलोड करण्यापूर्वी एखाद्याने त्याचे रिव्ह्यू देखील पाहिले पाहिजे.

   आपल्या मोबाइल फोनचे सॉफ्टवेअर नेहमीच अपडेट ठेवा

–   कोणत्याही सूट आणि इतर विनामूल्य ऑफरच्या कधीही मोहात पडू नका.

   आपल्याकडे येणाऱ्या कोणत्याही फॉरवर्ड मेसेजवर क्लिक करू नका. ते आपली वैयक्तिक माहिती चोरू शकतात.

यापूर्वी एसबीआयने ट्रोजन मालवेअर व्हायरसबद्दलही सतर्क केले होते. हा व्हायरस वापरकर्त्यांचा बँकिंग तपशील चोरण्याचे काम करते. या तपशीलांमध्ये क्रेडिट कार्ड नंबर, सीव्हीव्ही आणि इतर डेटा समाविष्ट आहे. ट्रोजन्सच्या मदतीने बळींचा शिकार करण्याशिवाय त्यांची वैयक्तिक माहिती आणि टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन डीटेल्स देखील चोरीला जाऊ शकतात.

कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान फसवणूक करणारे देखील पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय झाले आहेत. वापरकर्त्यांने कोणत्याही अज्ञात दुव्यावर क्लिक करू नये आणि केवळ प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअर वरून अ‍ॅप डाउनलोड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.