जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – तीर्थक्षेत्र जेजुरी श्री मार्तंड देव संस्थानच्या सहा महिन्यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी डायलिसिस अँड डायग्नोस्टिक सेंटर मध्ये रुग्णांसाठी फक्त १०० रुपयात डायलिसिस सुविधा देण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला असल्याचे विश्वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे यांनी सांगितले. या निर्णयाचा पुरंदर व आजूबाजूच्या तालुक्यातील गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांना मोठा फायदा होणार आहे.
सध्याच्या विश्वस्त मंडळाने शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले भक्त निवास इमारतीमध्ये सुमारे दीड कोटी रुपये खर्चाचे डायलिसिस व डायग्नोस्टिक सुविधा निर्माण केली आहे. १० फेब्रुवारी २०१९ रोजी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पवार पब्लिक ट्रस्टच्या वतीने २२ लाख रुपये खर्चाचे अद्ययावत रुग्णवाहिका देवसंस्थानला प्रदान करण्यात आली. तालुक्यामध्ये डायलिसिस चे सुमारे दोन हजारांहून अधिक रुग्ण आहेत सुरुवातीला ५०० रुपये फी रुग्णांसाठी आकारण्यात आली होती. आता फक्त १०० रुपये घेण्यात येणार आहेत.
सध्या दर महा १२५ रुग्ण या सुविधेचा लाभ घेत असून त्यांना आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा डायलिसिस करावे लागते. बहुतांश रुग्ण गोरगरीब, शेतकरी कुटुंबातील आहेत. याच सुविधेला पुणे किंवा इतर शहरात किमान दीड हजार रुपये खर्च येतो. मात्र जेजुरीत ही सुविधा केवळ १०० रुपयात करण्यात आल्याने रुग्ण व त्यांच्या नातलगांनी समाधान व्यक्त केले. या सेंटरमध्ये ५० टक्के सवलतीच्या दरात रक्ताच्या सर्व तपासण्या करण्यात येत असल्याचेही डॉक्टर संजय खेडेकर यांनी सांगितले.
रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी
दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार
असे ठेवा ‘मेंदू’वर नियंत्रण, जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय
आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’
पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’
स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा