डिप्रेशनमधून सुटका करून घेण्यासाठी हे आवश्य करा

पुणे – पोलीसनामा ऑनलाईन – केवळ १५ मिनिटं जॉगिंग केल्यास डिप्रेशनची समस्या खूप कमी होते. पंधरा मिनिटं जॉगिंग केल्यानं वा इतर शारीरिक काम केल्यानं हार्ट रेट वाढतो. त्याला स्वीट स्पॉट म्हणतात. व्यायामाआधी हार्ट रेट ६० असेल, तर नंतर तो ९० असणं आवश्यक आहे.
डिप्रेशनबाबतच्या या संशोधनात सहा लाखांहून अधिक जणांना सहभागी करण्यात आलं होतं. त्यापैकी अनेकांना एक्सेलेरोमीटर दिला होता. त्यापैकी बऱ्याच जणांनी व्यायामानंतर स्वत:हून सांगितलं की, त्यांचे डिप्रेशन कमी होत आहे. ज्यांनी व्यायाम केला नाही, त्यांचे डिप्रेशन कायम होतं. हा आजार अनुवंशिक नाही. आरोग्याची योग्य काळजी घेतली आणि जॉगिंग वा शारीरिक कामं केली, तर डिप्रेशनला सहज दूर करता येऊ शकते.