थर्टी फर्स्टच्या पार्शवभूमीवर फक्त 5 रुपयांत मिळवा दारू परवाना !

वृत्तसंस्था : सध्या सगळीकडेच जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. वर्षातल्या सर्व चांगल्या वाईट आठवणी जपत आता 2018 ला निरोप दिला जाणार आहे. त्याचबरोबर पुन्हा डोळ्यात अनेक स्वप्न घेवून नवे संकल्प करत 2019 या नविन वर्षाचं स्वागत केलं जाणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री 12 ते 12.30 वाजेपर्यंत फटाके उडविण्यास परवानगी देण्यात आली असल्याने नववर्षाचं उत्साहात स्वागत करण्यासाठी सगळीकडेच जय्यत तयारी सुरू झाली आहे.

अवघ्या काही तासात 2018 वर्षाला निरोप दिला जाईल. या साठी प्रत्येकाने आपा-पल्यापरीने सेलिब्रेशन्सचे प्लॅन देखील आखले आहेत. सरत्यावर्षाला निरोप देण्यासाठी त्याचबरोबर नवीन वर्षाच्या स्वागताच्या सेलिब्रेशनसाठी तरुणाई मद्याचा आस्वाद घेतांना दिसते. हि बाब लक्षात घेत आता उत्पादन शुल्क विभागाने जवळपास 1 लाख परवाने खुल्या बाजारात विक्रीसाठी ठेवले आहेत.आता मद्य घेण्यासाठी परवाण्याची आवश्यकता असणार आहे.

का घ्यावे लागणार परवाने? 
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल बिअरबार, परमिट रुम, त्याचबरोबर ढाबे चालकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. बिअरबारला पहाटे 5 वाजेपर्यंत तर वाईन शॉपला रात्री 1 वाजेपर्यंत विक्रीची परवानगी देण्यात आली असून. मद्यपींना आता परवाने घ्यावे लागणार आहेत. एका दिवसाच्या परवाण्यासाठी 5 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर मद्यपींवर करडी नजर ठेवण्यासाठी मुंबई, पुणे, सोलापूर येथील खास पथके तैनात करण्यात आली असून. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. मद्यपान करून वाहने चालवणार्‍यांवर त्याचबरोबर मद्य परवाना न घेतल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.