केवळ खर्च वाया गेल्याची टिका होऊ नये म्हणून पालिकेकडून बीआरटीचा अट्टहास ?

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या नऊ वर्षे वेगवेगळ्या अडचणीमुळे रखडलेल्या बीआरटीएस मार्गावरून उद्या शुक्रवार पासून बस धावणार आहे. मात्र गेली नऊ वर्षात झालेल्या २७ कोटी खर्चावर टिका होऊ नये यासाठी बीआरटी मार्ग सुरु करण्याचा अट्टहास करण्यात आला आहे का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे एका अधिकाऱ्याने हे बोलून दाखवले.
[amazon_link asins=’B01BKEZYBY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’80343257-a6d1-11e8-95dc-05de091ba5ff’]

नागरिकांना विनाअडथळा जलद प्रवास करता यावा, प्रदूषणमुक्तीसाठी सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा, यासाठी ‘बस रॅपिड ट्रान्झीट सिस्टम’ अर्थात बीआरटीएस मार्ग उभारण्यात आले आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून मुंबई-पुणे मार्गावरील निगडी ते दापोडी या साडेचौदा किलोमीटर लांबीच्या मार्गावर बीआरटीएस सेवा सुरू करण्याचा प्रकल्प रेंगाळला होता.

सन २०१३ मध्ये बीआरटीएस मार्गावर सुरक्षिततेबाबत उपाययोजना केल्या नसल्याचे कारण देत हिम्मतराव जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर पालिकेने सुरक्षिततेबाबत उपाययोजना करुन याचिकाकर्त्यांसोबत मार्गावर तीन वेळा बसची चाचणी घेतली. त्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावली झाली. न्यायालयाने बीआरटीएस बस सुरु करण्यास नुकताच हिरवा कंदील दर्शविला आहे. त्यानुसार शुक्रवारपासून या मार्गावर बस धावणार आहे. दोन महिन्यानंतर न्यायालयाला अहवाल सादर करुन कायमस्वरुपी बस चालू करण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार असल्याचे, आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.
[amazon_link asins=’B07417987C,B075BCSFNN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’882df8e8-a6d1-11e8-bd5d-97892bc789d2′]

२०११ पासून निगडी ते दापोडी या साडे चौदा किलोमीटर अंतरावर बीआरटी मार्गासाठी तब्बल २७ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या मार्गावरून दर एक ते तीन मिनिटाला बस धावणार आहे. मात्र निगडीहून दापोडीकडे जाणाऱ्या मार्गावर मोरवाडी चौकातून पुढे आल्यानंतर एक बस जाईल एवढाच रस्ता राहिलेला आहे. बीआरटी आणि सुरु असलेले मेट्रोचे काम यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी अटळ आहे. विशेष म्हणजे बीआरटी मार्गावर ‘इन-आउट’ मुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे फक्त खर्च वाया गेल्याची टिका होऊ नये म्हणून पालिकेकडून बीआरटीचा अट्टहास झाला असल्याची टीका होत आहे.