आज फक्त ‘मुख्यमंत्री’ अन् 6 ‘कॅबिनेट’ मंत्री शपथ घेतील, अजित पवारांनी स्वतः सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे आज सायंकाळी 6.40 वाजता शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्याच वेळी शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसच्या वतीनं 2 अशी एकुण 6 कॅबिनेट मंत्री शपथ घेतली. माझा आज शपथविधी होणार नाही असं स्पष्ट अजित पवारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे दोघे कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतील. विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणुक झाल्यानंतर बाकी सगळं होईल असं अजित पवारांनी सांगितलं आहे. काही तासांपुर्वी अजित पवार हे उपमुख्यमंत्री बनणार असल्याची माहिती समोर आली होती. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे जरी आज संध्याकाळी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेणार असले तरी उपमुख्यमंत्री पदाबाबत अद्याप भाष्य करण्यात आलेले नाही.

दरम्यान, अजित पवार हे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असं सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील आज केवळ राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ हेच मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत हे स्पष्ट केले.

अजित पवार हे अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदावर कायम ?

अजित पवार हे आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत पुन्हा एकदा अजित पवार हे अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होते काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. बैठकीनंतर अजित पवारांना पत्रकारांनी अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आता मला काहीच बोलायचे नाही, आज केवळ राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतील असे सांगितले.

Visit : Policenama.com