Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळं जगात येणार आर्थिक मंदी, फक्त वाचणार भारत आणि चीन : संयुक्त राष्ट्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे सध्या जग आर्थिक मंदीच्या वाटेवर असून यामुळे जगभरातील अर्थव्यवस्थेला अनेक ट्रिलियन डॉलरचे नुकसान होण्याचा अंदाज आहे. अलीकडेच आलेल्या संयुक्त राष्ट्राच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. या परिस्थितीत विकसनशील देशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल, पण चीन आणि भारतासारखे देश याला अपवाद असतील. यूएनसीटीएडीच्या सेक्रेटरी जनरल यांच्यानुसार, कोरोना व्हायरसमुळे आर्थिक घसरण होणार आहे. येणाऱ्या दिवसात ती आणखी वाढेल, ज्याचा अंदाज लावणे अवघड आहे.

काय परिणाम होणार चीन आणि भारतावर
संयुक्त राष्ट्राची संस्था युनायटेड नेशन ट्रेड अँड डेव्हलपमेंट बॉडी (UNCTAD) ने सध्याच्या परिस्थितीला पाहता अंदाज लावला आहे की, जगातील गरीब आणि विकसनशील देशांना आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी जवळजवळ २-३ ट्रिलियन डॉलरची गरज पडेल. संस्थेने हेही म्हटले की, विकसनशील देशात परिस्थिती सामान्य करण्यासाठी २ वर्षाचा कालावधी लागेल.

२० देशांनुसार, त्यांनी आपल्या अर्थव्यवस्थेसाठी तब्बल ३७५ लाख कोटी रुपयाच्या मदत पॅकेजची घोषणा केली आहे. यूएनसीटीएडीने म्हटले की, ‘हे एक मोठ्या संकटात उचलले गेलेले अभूतपूर्व पाऊल आहे. यामुळे या संकटाला आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या सामोरे जाण्यास मदत होईल.

युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड डेव्हलपमेंटची कोविड-१९ शॉक टू डेव्हलपिंग कंट्रीज : टुवर्डस अ व्हॉटेवर इट टेक्स या शीर्षकाचा यूएन ट्रेड अँड डेव्हलपमेंटचा प्रोग्रॅम जगातील दोन तृतीयांश लोकसंख्येसाठी खूप मागे राहिला आहे.