आषाढी एकादशी : पंढरपुरात येण्यास केवळ ‘या’ 9 पालख्यांना मिळाली परवानगी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पंढरीची वारी ही वारकऱ्यांचे जीवन असून पांडुरंग हा त्यांचा आत्मा आहे. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती आषाढी यात्रेसाठी पंढरीत भाविकांना येण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे आषाढी एकादशीच्या धार्मिक पुज्या मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. त्या दृष्टीने राज्य सरकार आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाने महापूजेचे नियोजन केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्निक महापूजा करण्यात येणार असून, मानाच्या वारकऱ्यास सुद्धा यंदा पूजेचा मान मिळणार आहे.

आषाढी सोहळ्या संदर्भात सोलापूर जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी सोलापूरचे अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख उपस्थित होते. यंदाच्या आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात येण्यास महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील नऊ मानाच्या पालख्यांचे परवानगी देण्यात आली असल्याचे तेव्हा सांगण्यात आले.

त्यात संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान (आळंदी), संत तुकाराम महाराज संस्थान (देहू), संत मुक्ताबाई संस्थान (मुक्ताईनगर, जि. जळगाव), संत सोपानदेव महाराज संस्थान (सासवड), संत एकनाथ महाराज संस्थान (पैठण, जि.औरंगाबाद), संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान (त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक), संत नामदेव महाराज संस्थान (पंढरपूर), विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान (कवंड्यापुर, जि. अमरावती), संत चांगावटेश्‍वर महाराज देवस्थान (सासवड)