पुण्यात दिवसातून एकदा पाणीपुरवठा

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन 

यंदा अखेरच्या टप्प्यात पावसाने ओढ दिल्याने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत पुरेसा पाणी साठा झालेला नाही. यामुळे पुणे शहराचा पाणी पुरवठा 200 एमएलडी ने कमी करण्याचा निर्णय आज झालेल्या कालवा समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. त्यामुळे यापुढे शहराला दिवसातून एक वेळ पाणी पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’89c54ddd-c7bf-11e8-86e0-bfa4fa70c4a2′]

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीमध्ये सध्या सुमारे 27 टीएमसी पाणीसाठा आहे. अंतिम टप्प्यात पावसाने ओढ दिल्याने धरणे पूर्ण क्षमतेने (29 टीएमसी क्षमता) भरलेली नाहीत. अशातच या धारणांवर अवलंबून असलेल्या इंदापूर परिसरातही यंदा पुरेसा पाऊस न पडल्याने त्यांना शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी पुरवठा करावा लागणार आहे.  पुढील पावसाळ्यापर्यंत साधारण दहा महिन्यांसाठी पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या कालवा समितीच्या बैठकीमध्ये पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यात 200 एमएलडी ने कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B019XSHB7O,B074RMN99F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’91f2f5bd-c7bf-11e8-a5ac-8347dc7b9d3b’]

यासंदर्भात बोलताना महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी म्हणाले, की सध्या 1350 एमएलडी पाणी उचलण्यात येत असून दिवसातून दोन वेळा पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु 200 एमएलडी पाणी कमी झाल्यास तांत्रिक कारणामुळे पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करता येत नाही. त्यामुळे एकवेळ परंतू पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. याचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल.

[amazon_link asins=’B00PQKR85E,B00VT8CUHS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9a48e6b1-c7bf-11e8-9263-971f47d75e6f’]