आई, वडील आणि शिक्षकांचा सन्मान कराल तरच जीवनात यशस्वी व्हाल

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन

(प्रतिनिधी-देवा राखुंडे)

आई, वडील आणि शिक्षकांचा सन्मान कराल तरच जीवनात यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडून विश्वासाहर्ता, प्रामाणिकपणा, नैतिकता हे गुण घेतले पाहिजेत. मी देखील गुरु, मित्र आणि आई वडीलांमुळे घडलो असल्याची कबुली बारामती विभागाचे पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगांवकर यांनी दिली. ते इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळ आणि राष्ट्रीय छात्र सेनाच्या वतीने आयोजित कार्यक्रम प्रसंगी त्यांनी वरील मत व्यक्त केले.

पुणे /दौंड : महिलेचा खून करून प्रेत पोत्यामध्ये भरून नदीत फेकले

कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन इंदापूर येथील कला, विज्ञान आणि  वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळ आणि राष्ट्रीय छात्र सेनाच्या वतीने  रोजी करण्यात आले होते यावेळी बारामती विभागाचे पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगांवकर यांनी विध्यार्थांना मार्गदर्शनसाठी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते.पुण्यासह राज्यभरात विघ्नहर्त्या बाप्पांचे वाजतगाजत आगमन

ते म्हणाले की ‘ प्रत्येकांनी आपले ध्येय निश्चित केले पाहिजे आणि ते साध्य करण्यासाठी कुठल्याही परिस्थितीचा बाऊ न करता ते पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करा यासाठी उत्तम शिक्षण घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे या गोष्टींचे भान ठेवा. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये सातत्य ठेवले पाहिजे, ग्रुप बनवून अभ्यास केला पाहिजे, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत इत्यादींची तयारी कशी करावी तसेच युवकांनी समाजामध्ये वावरताना काही गोष्टींनीचे भान ठेवले पाहिजे. यामध्ये सोशल मीडियाचा वापर कसा करायचा, मुली आणि महिला यांची छेड काढणे यांसंदर्भात असणारे कायदे व शिक्षा कोणकोणत्या आहेत इत्यादींची इत्यंभूत माहिती देत कायदा हातात घेणाऱ्यांना, गुन्हा करणाऱ्यांना कडक स्वरूपाच्या शिक्षा दिल्या जातील असे शिरगांवकर यांनी ठणकावून सांगितले.
[amazon_link asins=’B076H51BL9,B019MQLUZG,B07B6DM75J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d4ba57ae-b718-11e8-a0e8-a7f0ff4457c8′]

अध्यक्षिय भाषणात संस्थेचे सचिव मुकुंद शहा यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी हे महाविद्यालय आणि संस्था सातत्याने प्रयत्नशील असते. या विद्यार्थ्यांमधून अधिकारी घडले तर आम्हाला खूप आनंद होईल. असा आशावाद व्यक्त केला. प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासासाठी असे उपक्रम आवश्यक असून हे महाविद्यालय यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते. महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेसाठी स्वतंत्रपणे २४ तास चालणारे वाचनकक्ष निमार्ण केले आहे. याचबरोबरीने त्यांनी महाविद्यालयात चालणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यशाळेचे समन्वयक आणि विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. बाळासाहेब काळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

वाहनचालकांना धमकावणारा मुंढव्यातील तो फलक अखेर काढून टाकला

यावेळी पोलीस अधिकारी खंडागळे, उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे, विज्ञान विभागप्रमुख डॉ. शिवाजी वीर, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. सदाशिव उंबरदंड, क्रीडा संचालक प्रा. भरत भुजबळ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली मुकणे या विद्यार्थिनीने केले. आभार शितल कचरे या विद्यार्थिनीने केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. फिरोज शेख, प्रा. नामदेव पवार, प्रा. सोमनाथ पिसे, प्रा. मयूर मखरे, प्रदीप ओहोळ यांनी प्रयत्न केले.