ब्रॅडमन युगाचा अंत अन् तेंडुलकर युगाचा प्रारंभ, 14 ऑगस्ट ‘या’ दिवसाला विशेष महत्व

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४ ऑगस्ट या तारखेला विशेष महत्व असून या दिवशी ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज फलंदाज सर डॉन ब्रॅडमन युगाचा शेवट आणि सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीची सुरुवात झाल्याने या दिवसाला विशेष महत्व आहे. १९४८ मध्ये १४ ऑगस्ट रोजी सर डॉन ब्रॅडमन यांनी त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला होता. तर याच दिवशी ४२ वर्षानंतर म्हणजे सचिन तेंडुलकर याने भारतासाठी पदार्पण केले.

सर डॉन ब्रॅडमन यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीत आपली सरासरी ९९. ९४ इतकी राखली होती. त्यांच्या शेवटच्या सामन्यात जर त्यांनी ४ धाव केल्या असत्या तर त्यांची सरासरी १०० इतकी राहिली असती. मात्र दुर्दैवाने त्यांना या चार धावा करता आल्या नाहीत आणि ते शून्यावर बाद झाले. या सामन्याआधी त्यांची कसोटीमधील सरासरी हि १०१.३९ इतकी होती. तर दुसऱ्या बाजूला ४२ वर्षानंतर याच दिवशी भारताचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर याने इंग्लंडविरुद्ध आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. या सामन्यात भारताचे दिग्गज फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या सचिन तेंडुलकर याने १८९ चेंडूत ११९ धावांची शानदार शतकी केली. यावेळी सचिन तेंडुलकर याचे वय अवघे १७ वर्ष अवघे इतके होते.

दरम्यान, या सामन्यानंतर सचिन तेंडुलकरने जागतिक क्रिकेटमध्ये पराक्रम करत पुढील २३ वर्षात विक्रमी १०० आंतरराष्ट्रीय शतके झळकावण्याचा पराक्रम केला होता.

आरोग्यविषयक वृत्त –