खुशखबर ! सोनी कंपनीनं बनवला Wearable AC, उन्हाळयात ‘थंड’ तर थंडीमध्ये ठेवणार ‘गरम’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही वर्षात तंत्रज्ञानात प्रचंड बदल झाला आहे. स्वतःचे जीवन अधिक सुखकारक बनवण्यासाठी मानव नवीन तंत्रज्ञान विकसित करत असतो. मात्र प्रवास करत असताना किंवा कुठेही असताना तुम्ही विना एसीच्या थंड वातावरणाचा अनुभव घेऊ शकता. त्याचबरोबर यामुळे तुमची गर्मीपासून सुटका देखील होणार आहे. यासाठी सोनी कंपनीने ‘wearable air conditioner’ च्या रूपात यासाठी नाविन उपाय आणला आहे. यासाठी कंपनीने हे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे.

सोनीने एक ‘wearable air conditioner’ तयार केले असून त्याला REON POCKET असे नाव दिले आहे. हे तुम्ही कपड्याच्या आतमध्ये किंवा बाहेर देखील वापरून स्वतःला थंड ठेऊ शकता. हे डिव्हाईस पोर्टेबल असून या डिव्हाइसला तुम्ही तुमच्या मोबाईल फोनद्वारे नियंत्रित करू शकता. हे डिव्हाईस तुम्ही उन्हाळ्याबरोबरच थंडीमध्ये देखील वापरू शकता. या पॉकेट साईज डिव्हाइसला तुम्ही खिश्यात किंवा बॅगेमध्ये देखील घेऊन फिरू शकता. त्याचबरोबर तुम्ही हे टी-शर्टच्या वरच्या भागात आपल्या मानेवर किंवा डेडिकेटिड अंडरवियरमध्ये देखील ठेऊ शकता.

यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एक ऍप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर तुम्ही तुम्हाला हव्या तितक्या तापमानात त्याचा वापर करू शकता. हे डिव्हाईस सध्या स्मॉल, मीडियम आणि लार्ज साइजमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर हे डिव्हाईस फक्त पुरुषांसाठी उपलब्ध असून लवकरच महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दरम्यान, कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी या डिव्हाइसमध्ये लीथियम आयन बॅटरी बसवण्यात आली असून एकदा २ तास चार्ज केल्यानंतर तुम्ही संपूर्ण दिवसभर याचा वापर करू शकता. ब्लूटूथच्या माध्यमातून हे फोनबरोबर कनेक्टेड करू शकता. १४,०८० जपानी येन इतकी या डिव्हाईसची किंमत असून याबरोबर तुम्हाला एक अंडरवियर देखील मिळणार आहे. हे डिव्हाईस फक्त जपानमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

आरोग्यविषयक वृत्त –