अभिमान यांच्या भारतात परतण्याचे श्रेय ‘या’ नेत्याने दिले नवज्योत सिंह सिद्धूला

नवी दिल्ली पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान भारतात परतल्याचे श्रेय केरळच्या पुर्व मुख्यमंत्री नज्योतसिंह सिद्धू यांना दिले आहे. आज एक ट्विट करून त्यांनी सिद्धू यांच्या प्रयत्न आणि पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सद्भावामुळे अभिमान यांची भारत वापसी होऊ शकली असे म्हटले आहे. यावर सिद्धूनेही त्यांना प्रतिक्रिया देत सत्याच्या मार्गावर निडरपणे चालण्याची उर्जा मिळाली असल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानी विमानाचा पाठलाग करताना पाकिस्तानात कोसळलेल्या भारतीय विमानाचे वैमानिक विंग कमांडर अभिमान वर्धमान यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना शुक्रवारी भारताच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांच्या भारतात परतण्याने भारतात आनंदाचे वातावरण आहे. अभिमान यांच्या साहसाचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. परंतु त्यांच्या भारतात परतण्याचे श्रेय केरळचे माजी मुख्यमंत्री व कॉग्रेसचे वरिष्ठ नेते ओमान चंडी यांनी नवज्योतसिंह सिद्धू यांना दिले आहे.

काय म्हटले आहे ओमान चंडी यांच्या ट्विटमध्ये

नवज्योतसिंह सिद्धू यांचे प्रयत्न आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा सद्भाव यासाठी त्यांचे धन्यवाद. मला आशा आहे की, सीमेवर दोन्ही बाजूंनी शांतता राहील.

https://twitter.com/Oommen_Chandy/status/1101461843170680832?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1101499657451159554&ref_url=https%3A%2F%2Fkhabar.ndtv.com%2Fnews%2Findia%2Foommen-chandy-gives-credit-to-navjot-singh-sidhu-for-abhinandan-varthaman-return-2001522

तर त्याला नवज्योतसिंह सिद्धूने उत्तर देत लिहिले आहे की, आपल्या उत्साहवर्धनाने माझे धाडस वाढले आहे. मला निर्भयपणे सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा आणि नैतिक मुल्यांबाबत तडजोड न करण्याची मिळाली आहे. त्यात त्यांनी कवितेच्या चार ओळीही लिहिल्या आहेत.

“ उसुलों पर आंच आय तो टकराना जरूरी है,
जिंदा हो तो जिंदा नजर आना जरुरी है”