‘अप्सरा’ सोनालीच्या ‘रेड’ ब्लेझर लुकची चाहत्यांना ‘भुरळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठी इंडस्ट्रीतील अप्सरा अर्थातच सोनाली कुलकर्णी सध्या सोशलवर चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे तिचे समोर आलेले काही लेटेस्ट फोटो. सोनालीनं नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. फोटोत दिसत आहे की, तिनं रेड ब्लेझर घातला आहे. रेड ब्लेझरमध्ये सोनाली खूप ग्लॅमरस दिसत आहे. स्टनिंग दिसणाऱ्या सोनालीच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. सध्या तिनं आपल्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सोनालीनं केलेला रेड आणि ब्लॅक आऊटफिटमधील लुक पाहून चाहतेही तिच्यावर भाळले आहेत. तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅटीट्युड दिसत आहे. अभिनय, सौंदर्य आणि नृत्यानं सर्वांचं मन जिंकणाऱ्या सोनालीनं पुन्हा एकदा सर्वांना घायाळ केलं आहे. सोनालीची हेअर स्टाईलही तिच्या लुकला मॅच करत आहे. सोनालीनं इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना ती म्हणते, “Coz….. you’re worth it babe” तिच्या कॅप्शनमधून अंदाज येत आहे की, झी युवा वरील युवा डान्सिंग क्वीनसाठी तिनं हा लुक केला आहे. सध्या सोनालीचे हे फोटो प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.

सोनालीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सोनालीनं मराठी तसेच हिंदी सिनेमातही काम भरपूर काम केलं आहे. सोशलवर सोनाली नेहमीच सक्रिय असते. आपले अनेक नवीन फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसाठी आवर्जून शेअर करत असते.