रशिया आणि सौदी अरबच्या ‘या’ निर्णयामुळे वाढू शकतात भारतीयांच्या अडचणी, जाणून घ्या

लंडन/मॉस्को/दुबई : वृत्तसंस्था – ओपेक आणि रशियाच्या नेतृत्वाखालील अन्य सहकारी देश कच्चा तेलाच्या उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेऊ शकतात. सोबतच, इराक आणि नायजेरिया सारख्या देशांना सध्याच्या कपातीचे पालन करण्यासाठी दबाव वाढवू शकतात. नायजेरियाच्या इंधन मंत्र्यांनी कपात पुढेही जारी ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. नायजेरियाच्या मागे सौदी अरब आणि रशियासुद्धा आहेत. या देशांमध्ये ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे होईल. उत्पादनातील कपातीचा परिणाम भारतावर सुद्धा पडणार आहे, कारण ही कपात कच्च्या तेलाचे दर वाढवण्यासाठी केली जात आहे.

कोरोनाने बिघडवला कच्च्या तेलाचा खेळ
यापूर्वी ओपेक प्लस देशांनी मे-जूनच्या दरम्यान कच्च्या तेलाच्या उत्पादनात विक्रमी 97 लाख बॅरल प्रति दिवसाची कपात करण्याचा निर्यण घेतला होता. जेणेकरून किमतीमध्ये तेजी आणता यावी. मात्र, कोरोना व्हायरस महामारीमुळे कच्च्या तेलाच्या भावात विक्रमी घसरण दिसून आली आहे.

डिसेंबरपर्यंत उत्पादन कपातीच्या बाजूने सौदी अरब
न्यूज एजन्सी रॉयटर्सने ओपेक प्लस सूत्रांच्या संदर्भाने म्हटले की, सौदी अरब आणि रशिया जुलैपर्यंत सध्याची कपात कायम ठेवण्यावर सहमत झाले आहेत. सूत्रांनी सांगितले की, सौदी अरब ऑगस्टपर्यंत आणि शक्यतो डिसेंबरपर्यंत तेलाच्या उत्पादनात कपात जारी ठेवण्याच्या बाजूने आहेत.

बे्रंट क्रूडच्या दरात रिकव्हरी
ग्लोबल बेंचमार्क ब्रेंट क्रूडचा भाव एप्रिलमध्ये 20 डॉलर प्रति बॅरलच्या स्तरावरून घसरला होता. शुक्रवारी ब्रेंट क्रूडच्या भावात 6 टक्केची तेजी दिसून आली, ज्यानंतर तो 42 डॉलर प्रति बॅरलसोबत मागील तीन महिन्याच्या उच्चतम स्तरावर पोहचला आहे. जर, 2019 च्या तुलनेत हा अजूनही कमी आहे.

या शर्थीवरही नजर
नायजेरियाचे इंधन मंत्री टिमिप्रे सिल्वा यांनी म्हटले की, 12 एप्रिलच्या निर्णयाबाबत औपचारिक घोषणेची अपेक्षा आहे. एक किंवा दोन सदस्य देशांच्या सहमतीशिवाय सुद्धा या घोषणेची अपेक्षा आहे. ओपेक सूत्रांनुसार, कपात पुढे जारी ठेवण्याची एक शर्थ ही सुद्धा असू शकते की, ज्या देशांनी मे आणि जूनमध्ये आपल्या ठरलेल्या कोट्यातून अधिक उत्पादन केले आहे, त्यांना आगामी महिन्यात कपातीद्वारे त्याची भरपाई करावी लागेल. रॉयटर्सनुसार, मे महिन्यात कच्च्या तेलाच्या उत्पादन कपातीनुसार इराकचा रेकॉर्ड खराब होता. परंतु, इराकसुद्धा उत्पादन कपातीसाठी सहमत झाला आहे. मात्र, सध्या हे स्पष्ट झालेले नाही की, इराक अखेर कशाप्रकारे आपल्या आऊटपुटमध्ये कपात करेल. नायजेरियाने सुद्धा म्हटले आहे की, तो याचे पूर्ण पालन करण्याचा प्रयत्न करणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like