‘सर्व धर्मीय प्रार्थनास्थळं सुरू करा’ : रामदास आठवलेंचं CM ठाकरेंना पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं. या काळात सर्वध र्मीय प्रार्थनास्थळं बंद होती. राज्यात टप्प्याटप्प्यानं आता अनेक गोष्टी खुल्या केल्या जात आहेत. धार्मिक स्थळं मात्र खुली करण्यात आलेली नाहीत. भाविकांसाठी मंदिर, मस्जिद, चर्च, गुरूद्वारा, बुद्धविहार, देरासर अशी सर्व धार्मिक स्थळं खुली करावीत अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. आठवले यांनी या मागणीचं पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे.

मुस्लिम समाजाच्या वतीनं रिपाईचे अल्पसंख्यांक आघाडी मुंबई अध्यक्ष हसन शेख आणि अनिस पठाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आठवले यांना निवेदन देऊन मस्जिद सुरू करण्याची मागणी केली होती. मुंबई उच्च न्यायालयानं नुकतीच जैन धर्मियांना आठवड्यातून 2 वेळा देरासर सुरू करण्याची परवानगी दिली होती. रिपाई अल्पसंख्यांक आघाडीच्या शिष्टमंडळानं रामदास आठवले यांना हीच माहिती सांगत मस्जिद सुरू करण्यासाठी मागणी केली.

यानंतर रामदास आठवले यांनी सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याबाबत राज्यपाल आणि मुख्ममंत्र्यांना पत्र पाठवत असल्याचं आश्वासन दिलं होतं. दरम्यान रामदास आठवले यांनी फिजिकल डिस्टेंसिंग, मास्क, सॅनिटायझर असं सर्व गोष्टींचं पालन करत ही प्रार्थनास्थळं सुरू करावीत अशी मागणी केली आहे.