SBI मध्ये उघडा कमाई करणारे अकाऊंट, मिळेल 1350 रुपयांचा थेट लाभ , जाणून घ्या प्रक्रिया
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजच्या महागाईच्या युगात चांगली कमाई करण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. जर आपणही अशीच योजना आखत असाल तर देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया) आपल्या ग्राहकांना विशेष खाती उघडण्याची सुविधा देत आहे, ज्याद्वारे आपण पैसे कमवू शकता. यासह, आपण या खात्यात 1350 रुपये देखील वाचवाल. हेे खाते म्हणजे डिमॅट आणि ट्रेडिंग खाते आहे, ज्याद्वारे आपण शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांमध्ये पैसे गुंतवू शकता.
SBI ने केले ट्विट
स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्वीटमध्ये लिहिले की, एसबीआय ग्राहक आता योनो ॲपद्वारे डिमॅट आणि ट्रेडिंग खाती उघडू शकतात. योनो ॲपवर खाते उघडा आणि 1350 रुपये वाचवा. यात तुम्हाला 850 रुपये विनामूल्य खाते उघडण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय पहिल्या वर्षासाठी 500 रुपयांचे विनामूल्य डीपी एएमसी उपलब्ध असेल, या खात्याबद्दल अधिक माहितीसाठी आपण https://www.sbiyono.sbi/index.html या लिंकवर भेट देखील देऊ शकता.
डिमॅट खाते म्हणजे काय ?
या खात्याद्वारे आपण बाजारात पैसे गुंतवू शकता. जर आपण बाजारात पैसे गुंतविण्याचा विचार करीत असाल तर प्रथम आपण हे खाते उघडले पाहिजे. हे देखील इतर खात्यांसारखेच आहे जसे आपण इतर खात्यांद्वारे पैशांचे व्यवहार करू शकता त्याच प्रकारे आपण या खात्याद्वारे शेयर्सचे व्यवहार करू शकता. ऑनलाईन शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खाते आवश्यक आहे. आपण एसबीआय, एचडीएफसी सिक्युरिटीज, आयसीआयसीआय डायरेक्ट, अॅक्सिस डायरेक्ट अशा कोणत्याही ब्रोकरेज जवळ ते उघडू शकता.
खाते उघडण्याची प्रक्रिया ?
– यासाठी तुम्हाला प्रथम तुमच्या फोनमध्ये योने ॲप डाऊनलोड करावे लागेल.
– आता तुम्हाला त्यात लॉग इन करावे लागेल.
– त्यानंतर तुम्हाला गुंतवणूकीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
– येथे तुम्हाला ओपन डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यावर क्लिक करावे लागेल.
– प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सबमिटवर क्लिक करावे लागेल.
दरम्यान, बँकेने म्हटले की, सिक्युरिटीज मार्केटमधील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे, गुंतवणूकीपूर्वी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.