उल्फा अतिरेक्यांच्या गोळीबारात एकाच कुटुंबातील ५ ठार

दिसपूर : वृत्तसंस्था – आसाम येथील खैर बेरी जिल्ह्यात उल्फा अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला. तर, काही जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. युनाईटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (यूएलएफए) या अतिरेकी संघटनेने हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

श्यामल विश्वास, अनंत विश्वास, अविनाश विश्वास, सुबल दास आणि धनंजय नामशुद्रा, अशी यात मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दल दाखल झाले असून त्यांनी शोधमोहीम सुरू केली आहे. आसामचे मुख्यमंत्री सबरानंद सोनोवाल यांनी मंत्र्यांना तात्काळ घटनास्थळी दाखल होण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश सुद्धा त्यांनी दिलेले आहेत.

भाजपचे नेते अनिल परिहार आणि त्यांच्या भावाची हत्या

जाहिरात

Loading...
You might also like