AAP च्या नवनिर्वाचित MLA च्या ताफ्यावर ‘गोळीबार’ करणारा अटकेत, निशाण्यावर होतं भलतंच कोणीतरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणूकीत विजय मिळावल्यानंतर मंदिरातून दर्शन घेऊन परत येणारे आम आदमी पार्टीचे आमदार नरेश यादव यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर काही तासातच पोलिसांनी एका हल्लेखोराला ताब्यात घेतले. दक्षिण दिल्लीचे अतिरिक्त डीसीपी प्रताप सिंह यांनी घटनेनंतर या प्रकरणाची माहिती दिली. ते म्हणाले की या हल्ल्यात आपचे आमदार नरेश यादव हे निशाण्यावर नव्हते.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की हल्ल्यात ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तोच व्यक्ती आरोपीच्या निशाण्यावर होता. गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. अतिरिक्त पोलीस डीसीपी यांनी माहिती दिली की हल्लेखोरांना आपापसातील वाद असल्याने गोळीबार केला आणि ज्याला गोळी लागली तोच व्यक्ती आरोपीच्या निशाण्यावर होता. या व्यक्तीचे नाव अशोक मान असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.

दिल्ली पोलिसांच्या मते आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे की फक्त एकच हल्लेखोर होता, त्याने मृतक अशोकला निशाणा बनवला होता. तेथे 8 पेक्षा जास्त वेळा गोळीबाराचे राऊंड झाले. ज्यात 5 गोळ्या मृतक अशोकला लागल्या, जर दोन गोळ्या जखमी हरेंद्र यांना लागल्या. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत आणि घटनेमागचे कारण शोधत आहेत.