खुशखबर ! पोस्टात फक्त २० रुपयांत उघडा ‘खातं’, जास्त व्याजासह मिळणार ‘या’ सुविधा मोफत, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोस्टात अशा अनेक योजना आहेत, ज्या सामान्यांच्या फायद्याच्या असतात. पोस्ट ऑफिस म्हटले कि आपल्याला फक्त पत्रांची ने-आण आणि पैश्यांची वाहतूकच डोळ्यासमोर येते. मात्र पोस्ट ऑफिस तुम्हाला बँकेपेक्षा जास्त चांगल्या योजना आणि सुविधा देत असते. त्यामुळे तुम्ही कमीत कमी पैश्यात जास्तीत जास्त लाभ घेऊ शकता. यामध्ये आता तुम्ही पोस्टात २० रुपयांत बचत खाते उघडू शकता. त्याचबरोबर या खात्यात तुम्ही फक्त ५० रुपये ठेऊन देखील खाते चालू ठेऊ शकता. या सुविधेबरोबरच तुम्हाला या खात्याचे चेकबुक आणि एटीएम कार्ड देखील मिळणार आहे.
१० हजार रुपयांपर्यंत कर नाही
या बचत खात्यात तुम्ही देशभरातून कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून पैसे ट्रान्स्फर करू शकता. त्याचबरोबर या खात्यात मिळणारे १० हजार रुपयांपर्यंतचे व्याज करमुक्त असणार आहे.
या खात्याची वैशिष्ट्ये
या अकाऊंटवर ४ टक्के व्याज दिले जात असून चेक नको असलेलं सेव्हिंग अकाऊंट फक्त २० रुपयांमध्ये उघडता येणार आहे. तर चेक हवे असल्यास तुम्हाला तुमच्या खात्यात ५०० रुपये भरावे लागणार आहेत. दोन ते तीन जण मिळून संयुक्त खातं देखील उघडू शकतात. बचत खाते कार्यान्वित राहण्यासाठी तीन वर्षांतून एकदा तरी व्यवहार करणं आवश्यक आहे.
अशा प्रकारे उघडा बचत खातं
पोस्ट ऑफिसमध्ये हे बचत खाते उघडण्यासाठी एक फॉर्म भरावा लागतो. हा फॉर्म पोस्ट ऑफिसशिवाय इतर साइटवरून देखील डाऊनलोड करू शकता. हे बचत खाते उघडण्यासाठी KYC पूर्ण करावं लागतं.
ही कागदपत्रे आहेत गरजेची
हे खाते उघडण्यासाठी तुच्याकडे मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड त्याचबरोबर पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, लाईटबील ही कागदपत्रे आवश्यक आहेत. तसेच पासपोर्ट साइज फोटो आणि संयुक्त खात्यात इतर खातेधारकांचे फोटो असणं गरजेचं आहे.
७ दिवसात आत जाऊ शकते पोट, ‘हे’ ११ उपाय आहेत ‘रामबाण’
आरोग्य समस्यांवर ‘हे’ १० छोटे-छोटे घरगुती उपाय, जाणून घ्या
भारतात HIV पेक्षाही ‘हिपॅटायटीस’ अधिक घातक, पावसाळ्यात विशेष काळजी घ्या
‘सेक्स पॉवर’ कमी झाल्यास बिघडू शकते वैवाहिक जीवन, करा ‘हे’ खास उपाय
अशाप्रकारे परत मिळू शकते त्वचेची चमक, ‘हे’ ४ उपाय आवश्य करा
औषधी न घेता आहाराने लिव्हर ठेवा ठणठणीत, जाणून घ्या ११ उपाय