लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा, १ हजार कोटींची कामे करणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कारण विमानतळालगतची २५ एकर खासगी जागा हस्तांतरण विकास हक्काद्वारे संपादित करण्यात येणार असून यासाठी संबंधित विकास क्षेत्रातील जागा नगरविकास खात्याने सूट आराखड्यामध्ये वर्ग केली आहे. विमानतळाच्या पायाभूत सुविधांची एक हजार कोटींची कामे येत्या दीड वर्षात केली जातील. या विस्तारीकरणासाठी लष्कराकडून दहा एकर जागा घेण्यात आली असून त्या बदल्यात गुजरातमधील अहमदाबाद येथे लष्कराला जागा दिली जाईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eeaa8ec0-ab48-11e8-823f-8197be52db4d’]

लोहगाव विमानतळावरील हवाई वाहतूकीत मागील काही वर्षात मोठी वाढ झाली आहे. मात्र, विमानतळ परिसरात अनेक सोयी- सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे विमानतळाचे आधुनिकीकरण आणि विमानतळ परिसरात पायाभूत सुविधा निर्माण करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. पुण्यात लष्कराचे दक्षिण मुख्यालय असून लोहगाव विमानतळासह लोहगाव परिसरात तब्बल दोन हजार दोनशे एकर जमीन लष्कराच्या ताब्यात आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने हवाई दलाकडे विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी जागा मागितली आहे. मात्र, या जागेच्या बदल्यात पर्यायी तेवढ्याच जागेची मागणी हवाई दलाकडून करण्यात आली होती. त्यानुसार पंचवीस एकर खासगी जागा संपादित करून देण्यात येत आहे.

विमानतळालगतची २५ एकर खासगी जागा हस्तांतरण विकास हक्काद्वारे संपादित करण्यात येणार असून यासाठी संबंधित ना विकास क्षेत्रातील जागा नगरविकास खात्याने सूट आराखड्यामध्ये वर्ग केली आहे. यामुळे विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याने येत्या दीड वर्षात लोहगाव विमानतळावर वाहनतळ, टर्मिनल इमारत अशी एक हजार कोटींची पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.
मार्च महिन्यात केंद्रीय मंत्री आणि केंद्र सरकारच्या पायाभूत सुविधा समितीचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून विमानतळ विस्तारीकरणाबाबत राज्य शासनाने २५ एकर जागा हस्तांतरित करण्याबाबत तत्त्वत: मान्यता दिली होती. त्यानुसार  संबंधित जागा ना विकास क्षेत्रातून विकास क्षेत्रात रुपांतरित करण्यात आली आहे. याबरोबरच दहा एकर जागेत पायाभूत सुविधांची कामे सुरू करण्यात आली आहेत.

आज १० वी फेरपरीक्षेचा निकाल