देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना ‘आव्हान’, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आर्थिक परिस्थितीसंदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची महाआघाडी सरकारची योजना आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढून जरुर जाहीर करावी आम्ही त्याचे स्वागत करु असं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

राज्याच्या आर्थिक परिस्थितीची श्वेतपत्रिका लवकरच जनतेसमोर मांडण्यात येईल. संपूर्ण राज्यात कोणती विकास कामे सुरू आहेत, ती कोठे सुरू आहेत. त्यावर किती खर्च होत आहे, किती कामे पूर्णत्वाला आली आहेत, कोणती कामे रखडली आहेत व त्यामागील कारणे काय, याचा लेखाजोखा आर्थिक श्वेतपत्रिकेत जनतेसमोर मांडण्यात येईल. त्यानंतर आमचे सरकार कामांचा प्राधान्यक्रम ठरवेल. काही तातडीच्या कामांकडे दुर्लक्ष झाले असेल तर त्याकडे लक्ष देऊन पैसे देण्यात येतील, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली आहे. तसेच दरवर्षी राज्यातून दीड ते पावणेदोन लाख कोटी रुपये महसूल केंद्राला जातो. दोन वर्षांसाठी हा कर माफ केला तरी राज्य कर्जातून बाहेर पडू शकते, तर केंद्राने साह्य केले पाहिजे, अशी भूमिकासुद्धा ठाकरे यांनी या वेळी मांडली.

श्वेतपत्रिकेविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढून जरुर जाहीर करावी आम्ही त्याचे स्वागत करु. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना 25 हजार हेक्टरी मदत करणार असल्याचे सांगितलं होतं. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना तात्काळ 25 हजार रुपये हेक्टरी मदत करावी. त्याचप्रमाणे केंद्राच्या मदतीची कोणतीही वाट न पाहता तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी.’

Visit : Policenama.com