पुणे नवरात्रौ महोत्सवाचे १o ऑक्टोबरला उद्घाटन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

गायन, वादन, नर्तन आदी कलांचा सुंदर मिलाफ असणारा पुणे नवरात्रौ महोत्सव यंदा दि. १o ते १८ ऑक्टोबर साजरा होणार आहे. पु.ल.देशपांडे, ग.दि. माडगूळकर आणि सुधीर फडके या चतुरस्त्र प्रतिभावंतांना यंदाचा महोत्सव समर्पित केला आहे, अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष माजी उपमहापौर आबा बागुल यांनी दिली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ff6687a6-cb7d-11e8-a92a-85a6e4ab6f56′]

महोत्सवाचे यंदा २४. वे वर्ष असून श्री गणेश कला क्रीडा केंद्र येथे कार्यक्रम सादर होणार आहेत. महोत्सवाचे उद्घाटन खासदार रजनी पाटील यांच्या हस्ते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. मराठी बिग बॉस फेम अभिनेता पुष्कर जोग, सई लोकूर, शर्मिष्ठा राऊत तसेच हेमांगी कवी, सुवर्णा काळे, तन्वी माने यांचा फ्युजन कलरफुल हा कलाविष्कार यंदाच्या उद्घाटन सोहळ्याचे आकर्षण आहे.

ट्विटरवरही अमिताभच शहनशाह

महोत्सवाचा श्री लक्ष्मीमाता कला, संस्कृती जीवनगौरव पुरस्कार डॉ.जगन्नाथ दीक्षित, क्विक हील कंपनीचे कैलास काटकर, शिक्षणतज्ज्ञ प्रदीप लोखंडे, लेखक प्रशांत इंगवले, अभिनेत्री वैशाली जाधव यांना प्रदान करण्यात येणार आहे. महोत्सवात मामला चोरीचा आणि लाईफ पार्टनर्स ही दोन मराठी नाटके, लावणी महोत्सव, हिंदी-मराठी गाण्यांचे संगीत कार्यक्रम, मराठी झिंगाट गाणी असे विविध कार्यक्रम सादर होणार आहेत. याखेरीज श्री लक्ष्मी माता मंदिरात महिला महोत्सव साजरा होणार आहे. या महोत्सवाच्या संयोजनात जयश्री बागुल, घनश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, अमित बागुल आदींचा सहभाग आहे.

[amazon_link asins=’B00CHXQD7M’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c00750c6-cb7f-11e8-aa60-55913eb744fa’]

द्वारका पीठाचे महाराष्ट्राचे प्रतिनिधी श्री .शंकर दत्त महाशब्दे यांचे महोत्सवाला आशीर्वाद लाभले आहेत. कार्यकारी समितीत राजेंद्र बागुल, जयवंत जगताप, कपिल बागुल, हेमंत बागुल, राजेंद्र बडगे, टी. एस. पवार, सागर बागुल, सागर आरोळे, महेश ढवळे यांचा समावेश आहे . शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिरात घटस्थापना दि .१० रोजी अश्विन शुद्ध प्रतिपदेला आबा बागुल आणि सौ. जयश्री बागुल यांच्या हस्ते केली जाणार आहे. नवरात्रीत विधीवत् पूजापाठ आणि भजन होईल.