# Video : विश्वकप २०१९ : धमाकेदार सुरुवात, ‘या’ संघाने १ मिनिटात केल्या ७४ धावा

लंडन : वृत्तसंस्था – आय़सीसी क्रिकेट विश्वकपला आजपासून सुरुवात होत आहे. दरम्यान लंडनमध्ये उद्घाटन समारंभ झाला. यात गाणी आणि क्रिकेट सामनेसुद्धा झाले.या दिमाखदार सोहळ्यात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते एक मिनिटाच्या सामन्याने. या उदघाटन सोहळ्यात फार मजेशीर असा सर्व संघांचा एक मिनिटाचा सामना खेळवण्यात आला.

या चॅलेंजमध्ये मात्र भारतीय संघ तळाला राहिला आहे. मुख्य स्पर्धेपूर्वी देण्यात आलेल्या एक मिनिटाच्या चॅलेंजमध्ये भारताच्या चमूला दहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. यजमान इंग्लंडने अव्वल, तर ऑस्ट्रेलियाने दुसरे स्थान पटकावले. या सगळ्यात भारतीय संघ विजेतेपदाची स्वप्न बघत असताना या चॅलेंजने या स्पर्धेत रंगात आणली.

या चॅलेंजमध्ये भारताकडून चॅलेंजमध्ये अनिल कुंबळे आणि बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर सहभागी झाला होता. यात विव रिचर्ड्स, जॅक कॅलिस, ब्रेट ली, केविन पीटरसन यांनीसुद्धा सहभाग घेतला होता. या चॅलेंजमध्ये भारताने सर्वात कमी म्हणजे १९ धावा केल्या तर यजमान इंग्लडने सर्वात जास्त ७४ धावा केल्या.दरम्यान, भारत आपला पहिला सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर ५ जून रोजी खेळणार आहे.
तर चला पाहुयात काय झाले या एक मिनिटांच्या चॅलेंजमध्ये