गुन्हेगारी थोपविण्यासाठी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड शहरातील कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे. त्यातच नव्याने बदलून आलेले अधिकारी, कर्मचारी, यांना हद्दीची अजूनही पुरेशी माहिती नसल्याने गुन्हेगारीत वाढ होत आहे. शहरात वाहनांची तोडफोड सत्र हे पोलिसांची नाचकती आहे. त्यामुळे या वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून 15 दिवसांच्या फरकाने लगेच दुसरे ऑपरेशन ऑल आऊट घेण्यात आले. यामध्ये सुमारे 150 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ही मोहीम शुक्रवारी रात्री नऊ ते रात्री अकरा वाजेपर्यंत परिमंडळ तीनच्या हद्दीत राबविण्यात आली.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7c446297-872b-11e8-a745-b5ceed4b8a8c’]
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ तीनमध्ये पोलीस उपआयुक्त गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन ऑलआऊट राबविण्यात आले. या मोहिमेत तडीपार, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, रेकॉर्डवरील, फरार, दुकानाबाहेर दारू पिणारे, वेगात वाहन चालवणा-या अशा वेगवेगळ्या गुन्ह्यातील सुमारे 150 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.  “रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि फरार गुन्हेगारांचा शोध घेत मैदाने आणि मोकळ्या जागेत विनाकारण जमाव करून थांबणा-या मुलांच्या टोळ्या, वेगात गाडी चालवणा-यांना तपासण्यात आले.

परवानाधारक दारूच्या दुकानाबाहेर उभा राहून दारू पिणा-यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. मोहिमेसाठी शहरातील काही भाग निश्चित करण्यात आला. त्या भागांमध्ये जाऊन पोलिसांनी ही मोहीम राबविली. पकडण्यात आलेल्या सर्व आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.”