‘ऑपरेशन सर्द हवा’नं पाकिस्तानची ‘भंबेरी’ उडाली, ‘गफूर’ला सीमेवर केलं ‘तैनात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लवकरच येणारा प्रजासत्ताक दिन नजरेसमोर ठेवून सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनाद करण्यात आली आहे आणि पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवली जात आहे. भारताने पश्चिमेकडील सीमेवर असे ऑपरेशन सुरु केले आहे ज्यामुळे स्वतः पाकिस्तानची देखील घाबरगुंडी उडाली आहे. ‘ऑपरेशन सर्द हवा’ असे या ऑपरेशनचे नाव आहे. हा सीमांच्या चौकशी आणि सुरक्षेबाबतचा महत्वाचा अभ्यास असणार आहे.

एवढेच नाही तर पाकिस्तानवर माजी लष्करी प्रवक्ते असलेले मेजर जनरल असिफ गफूर यांना देखरेखीसाठी तैनात केले गेले आहे. गफूर यांना भारताच्या सीमेवरील ओकारा येथील विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग बनविण्यात आले आहे.

राजस्थान, गुजरात, जम्मू काश्मीर आणि पंजाबला लागून असलेल्या पाकिस्तानी सीमांवर सुरु केलेल्या अभ्यासामध्ये सीमा सुरक्षा दलाच्या कमांडंट पासून ते सर्व तुकड्यांचे अधीकारी आणि जवान सहभाग घेणार आहेत.

या ऑपरेशनमुळे सीमेवरील पहारा कडक करण्यात आलेला आहे. यामध्ये उंटांवरून केले जाणारे पेट्रोलिंग आणि गाड्यावरून केले जाणारे पेट्रोलिंग यामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सर्वेलांस आणि इंटेलिजन्स ग्रीडला देखील मजबूत करण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/