सुशांतच्या घरी पार्टीमध्ये ‘चरस’चा मोठा वापर, माजी बॉडीगार्डचा खळबळजनक दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो सुशांत सिंह राजपूत केसमध्ये ड्रग अँगलचा शोध घेत आहे. यासंदर्भात इंडिया टुडेने केलेल्या शोधवार्तांकनात काही ठोस पुरावे समोर आले आहे, जे अ‍ॅक्टरला चरस आणि मारिजुआनाचे व्यसन असल्याकडे इशारा करतात.

पार्टीत चरसचा वापर
सुशांतचा माजी बॉडीगार्ड मुश्ताकने इंडिया टुडेच्या अंडरकव्हर रिपोर्टमध्ये सांगितले की, त्याने बॉलीवुड स्टारला खासगी पार्ट्यांदरम्यान आणि आपल्या कारमध्ये प्रवास करताना महागडे आणि इम्पोर्टेड चरस घेताना पाहिले होते. इंडिया टुडेच्या अंडरकव्हर रिपोर्टरने स्वताची ओळख फिल्ममेकर्स करून देऊन मुश्ताकशी चर्चा केली.

मुश्ताकने मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये नोकरी सोडण्यापूर्वी सुमारे 9 महिन्यापर्यंत अ‍ॅक्टरच्या खासगी सिक्युरिटी एस्कॉर्टमध्ये काम केले.

समोर आली ड्रग लिंक
सुशांतचा हाऊसकीपर नीरजने पोलिसांना दिलेल्या जबाबात दावा केला होता की, त्याने अ‍ॅक्टरच्या मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदर मारिजुआनाच्या सिगरेटचे रोल केले होते.

रिया-श्रुती मोदीचे चॅट काय सांगते
रिया चक्रवर्ती आणि मॅनेजरमध्ये कथित व्हॉट्सअप चॅटसुद्धा सुशांतच्या प्रतिबंधित पदार्थांच्या व्यसनाकडे इशारा करते. मुश्ताकने इंडिया टुडेला जे सांगितले ते देखील याच गोष्टीकडे इशारा करत आहे.

रिपोर्टर – त्याने (सुशांतने) चरस घेतले होते?

मुश्ताक- होय, त्याने घेतले होते… घरात पार्ट्यांच्या दरम्यान, 5 ते 6 लोक असत. त्यावेळी तो चरस किंवा गांजा घेत असे. खोलीत प्रत्येकजण हेच कर असे. मी ऐकले होते की, ती एक महागडी वस्तू होती.

मुश्ताकने दावा केला की, त्याने सुशांतच्या एका मॅनेजरला चरसच्या वाईट परिणामांबद्दल सावध देखील केले होते.

मुश्ताक – मी त्याला सांगितले होते की, हे व्यसन मानसिक गुंतागुंतीकडे घेऊन जाईल, परंतु त्याने (मॅनेजर) मला म्हटले की हे (चरस) काही साधारण भारतीय प्रकारचे नाही. हे महागडे होते.

मुश्ताकनुसार राजपूतच्या पर्सनल स्टाफमधील तीन, चार लोक त्याच्यासाठी चरस रोल करत होते.

मुश्ताकने म्हटले, आम्हाला निर्देश होते की, कारमध्ये याची (चरस) कोणतीही निशाणी सोडू नका. कारण असे केल्याने चेकिंग दरम्यान पकडले जाण्याचा धोका होता.

सुशांतचा स्वभाव असा होता
मुश्ताकने जोर देऊन म्हटले की, सुशांतचा स्वभाव अनिश्चित प्रकारचा होतो.

मुश्ताक – कोणत्याही शूट्सदरम्यान त्याच्या मूडचा अंदाज लावता येत नव्हता. शूटच्या दरम्यान, तो काहीही मागू शकत होता आणि नाही मिळाले तर नियंत्रण सोडायचा. तो आपल्या मूडमुळे अचानक शुटिंग रद्द करू शकत होता. असे अनेकदा झाले. सेट लावलेला असताना शूट कँसल केले गेले.

मुश्ताकनुसार अ‍ॅक्टरसोबत नऊ महिने असताना त्याने चार-पाच पर्सनल स्टाफ सदस्यांना काढून टाकताना पाहिले.

सुशांतच्या माजी बॉडीगार्डने दावा केला की, तो लोकांना कोणतीही चूक नसताना अचानक कामावरून काढून टाकत असे.

टीव्हीवर खोटे कौतूक
मुश्ताकने कबूल केले की, त्याने अन्य टीव्ही नेटवर्क्सवर सुशांतचे खोटेच कौतूक केले.

मुश्ताकने म्हटले, मी मुलाखतींमध्ये सर्वकाही सांगू शकत नाही. मी केवळ खोटे कौतूकच करू शकतो. नाही तर लोक माझे पुतळे जाळतील. आता मी वरच्याकडे माफी मागत आहे.