भारतात लॉन्च झाला Oppo F15, 5 मिनिटं चार्जिंग करा देतो दोन तासांचा टॉकटाइम बॅकअप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात ओप्पोने नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनचं नाव आहे Oppo F15. या फोनचे महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ पाच मिनिटे चार्ज केल्यानंतर हा फोन दोन तासांचा टॉकटाईम बॅकअप देईल असा कंपनीचा दावा आहे. या फोनसाठी पाहिला सेल येत्या २४ तारखेला होणार आहे. हा स्मार्टफोन  आणि फ्लिपकार्ट सारख्या संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहे.

काय आहेत वैशिष्ट्ये

यामध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे.
या स्मार्टफोनमध्ये स्लीक डिझाइन असून 6.4 इंचाची फुल HD+ AMOLED स्क्रीन आहे.
गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन या फोनला देण्यात आले आहे.
या फोनचा मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सल क्षमतेचा असून अन्य कॅमेरे 8, 2 आणि 2 मेगापिक्सल क्षमतेचे आहेत.
सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
स्मार्टफोनमधील स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येईल.
फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असून हा स्मार्टफोन 0.32 सेकंदात अनलॉक होतो
फोनमध्ये 3 कार्ड स्लॉट दिले आहेत.
हा स्मार्टफोन लाइटनिंग ब्लॅक आणि युनिकॉर्न व्हाइट कलरमध्ये मिळेल.
हा स्मार्टफोन Android Pie V9.0 वर आधारीत Color OS 6.1 वर कार्यरत असेल.
या फोनची किंमत आहे 19 हजार 990 रुपये.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like