Oppo चे ‘झक्कास’ फोन्स 7 हजारांच्या ‘डिस्काऊंट’वर खरेदी करण्याची ‘सुवर्ण’संधी, 13 फेब्रुवारीपर्यंत ‘ऑफर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 10 फेब्रुवारीपासून ‘ओप्पो फॅन्टॅस्टिक डेज’ला सुरुवात झाली असून अ‍ॅमेझॉनवर या सेलची विक्री सुरू झाली आहे. या फॅन्टॅस्टिक ऑफरमध्ये ग्राहकांना ओप्पोच्या स्मार्टफोनवर 7,000 रुपयांची सूट मिळू शकते. इतकेच नाही तर या सेलमध्ये ईएमआय पर्यायदेखील देण्यात येत आहे, त्याअंतर्गत प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला 1,415 रुपयांची ईएमआय खरेदी करू शकता.

ओप्पोच्या 48 मेगापिक्सेलवाला F11 बद्दल बोलायचे झाले तर हा फोन 23,990 रुपयांऐवजी अवघ्या 13,990 रुपयात खरेदी करता येणार आहे. तसेच, ओप्पो F11 2,332 च्या ईएमआयवर घरी आणता येईल. या फोनमध्ये 4020mAh बॅटरी देण्यात आली आहे.

सेलमध्ये ओप्पो A9 ला 16,990 रुपयांऐवजी 11,990 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी दिली जात आहे. फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असून हा फोन 1,998 रुपयांच्या ईएमआयमध्येही खरेदी करता येईल.

ओप्पो F15 मध्ये 48 मेगापिक्सलचा AI कॅमेरा असून हा फोन 19,990 रुपयांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे, ज्याची वास्तविक किंमत 22, 990 रुपये आहे. ओप्पो A7 बद्दल बोलायचे झाल्यास हा फोन अर्ध्या किंमतीवर खरेदी करता येणार आहे. 16,990 या मूळ किमतीऐवजी केवळ 8,990 रुपयांत घरी आणला जाऊ शकतो.

ओप्पो Reno (10x zoom) 7000 रुपयांच्या सवलतीत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सवलतीच्या नंतर हा फोन अवघ्या 32,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

Oppo A5 मध्ये रिव्हर्स चार्जिंग सारखे फीचर्स देण्यात आले असून स्नॅपड्रॅगन 665 उपस्थित आहे. ग्राहक हा फोन 14,990 रुपयांऐवजी केवळ 11,490 रुपयांमध्ये घेऊ शकतात. त्याचबरोबर ओप्पो A9 बद्दल सांगायचे तर हा फोन 18,990 रुपयांऐवजी 15,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी आहे.