Oppo सेल : स्मार्टफोनवर 13000 रूपयांचा ‘डिस्काऊंट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ग्राहकांसाठी खास संधी ओप्पोचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर २४ फेब्रुवारीपासून ओप्पोने ओप्पो फॅन्टॅस्टिक डेज सुरु केले आहे. २७ फेब्रुवारी पर्यंत हा सेल सुरु राहणार आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर ओप्पोच्या फोन वरती डिस्काउंट दिला जात आहे. ओप्पो एफ११ प्रो (Oppo F11 Pro) आणि ओप्पो रेनो २, (Oppo Reno 2) या स्मार्टफोन वर डिस्काउंट मिळत आहे.

१३००० रुपयापर्यंत डिस्काउंट 

तेरा हजारापर्यंत Oppo F11 Pro फोनवर डिस्काउंट दिला जात आहे. जेव्हा हा फोन लॉंच झाला होता तेव्हा २८ हजार ९९०रुपये या फोन ची किंमत होती आता या सेल मध्ये हा फोन १५ हजार ९९० रुपयात खरेदी करू शकता. या सीरीजमध्ये कंपनीने ओप्पो एफ११ प्रो आणि ओप्पो एफ११ लाँच केले होते. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये १०८०X२३४० पिक्सलचा रिझॉल्यूशन दिला आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस स्क्रीन देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी रियरमध्ये ड्युअल रियर कॅमेरा दिला आहे. ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सह ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेरा दिला आहे.

ओप्पो रेनो २ या फोन ची लॉंच वेळी २८ हजार ९९० रुपये किंमत होती पण तोच फोन आता फक्त २१ हजार ९९० रुपयात मला आहे. यामध्ये या फोनवर ७००० रुपये डिस्काउंट दिला जात आहे. या स्मार्टफोनमध्ये हिडन फिंगरप्रिंट अनलॉक ३.० देण्यात आली आहे. त्याचबरोबर फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले, ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज, क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ७३० जी ऑक्टा-कोर प्रोसेसर, ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी या सर्व गोष्टी या फोन मध्ये देण्यात आलेल्या आहेत. ओशन ब्लू आणि ल्यूमिनस ब्लॅक या दोन रंगात हा फोन उपलब्द आहे.