विरोधकांकडे मुद्दा नसल्याने कारखान्यावर टीका : आ.राहुल कूल

सेल्फी विथ फॅक्टरला सेल्फी विथ डेव्हलपमेंट ने उत्तर

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यामध्ये मागील काळात विरोधकांनी आणलेल्या निधीपेक्षा चारपट जास्त निधीची विकास कामे आम्ही केली आहेत. अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत. त्यामुळे विरोधकांकडे कुठलाच मुद्दा राहिला नसल्याने कारखान्यावर टीका केली जाते. असे मत दौंड चे आमदार राहुल कूल यांनी व्यक्त केले.

आम्ही सेल्फी विथ खड्डे फॅक्टर ला सेल्फी विथ डेव्हलपमेंट ने उत्तर द्यायचे सुरू केले आहे. कामे सुरू होण्याच्या आधी रस्त्यांचे फोटो काढायचे आणि ते व्हायरल करायचे असा कार्यक्रम सुरू होता. त्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांना सेल्फी विथ डेव्हलपमेंट असा उपक्रम राबविण्यास सांगितले.

निवडणुका आल्या कि वेगवेगळे प्रश्न विचारायचे हा एक कलमी कार्यक्रम या विरोधातील मंडळींचा सुरू असतो. परंतु या मंडळींना खरोखरच प्रश्न विचारन्याचा अधिकार आहे का ? हाच मुळात एक प्रश्न आहे. असे म्हणत एकदा कारखान्याची चौकशी लावाच त्यामध्ये मग त्यावेळी कारखान्याचे एक्सपांशन कसं झालं, कारखान्यावर विनातारण, विना कारण पन्नास कोटी कर्ज का घेतलं होतं याची चौकशी पण होऊद्या. मग खरं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असं त्यांनी सांगितले.

ज्यांनी सहकारी कारखाने खाजगी करून त्यामध्ये एजंटगीरी केली तेच आज सहकारी कारखाण्याबाबत चुकीची विधाने करत आहेत. यांनीच सहकारी साखर कारखाना झोपवण्याचा प्रयत्न केला. असा आरोप आ.राहुल कूल यांनी केला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like