शिवसेनेकडून नव्या चेहऱ्यांना ‘संधी’, माजी मंत्री सावंत, रावते आणि रामदास कदम डावलले ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा आज सोमवारी मंत्रिमंडळ विस्ताराचा होत असून त्यात शिवसेनेने विधान परिषदेच्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. राज्यातील ग्रामीण भागातील विधानसभेच्या नव्या आमदारांना संधी देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.

शिवसेनेने मागील युतीच्या मंत्रिमंडळातील तानाजी सावंत, दिवाकर रावते, रामदास कदम यांना वगळण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. विधानपरिषदेतील फक्त अनिल परब यांचा समावेश करण्यात आल्याचे सांगण्यात येते. शिवसेनेने गुलाबराव पाटील, उदय सामंत, संजय राठोड, दादा भुसे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, शंभुराजे देसाई यांना कॅबिनेट मंत्री देण्यात आले असल्याचे सांगितले जाते. शिवसेनेला पाठिंबा देणारे बच्चु कडू यांचाही शपथविधी होणार आहे.

भाजपा शिवसेना मंत्रिमंडळात शिवसेनेकडून विधान परिषदेतील आमदारांना झुकते माप दिल्याने विधानसभेवर निवडून आलेल्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. आम्ही थेट लोकांमधून निवडून येतो़ जर शिवसेना वाढवायची असेल, तर विधानसभेतील आमदारांना संधी दिली पाहिजे, अशी या आमदारांची मागणी होती. त्याची यावेळी उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली असल्याचे सांगितले जाते. राज्यातील ग्रामीण भागात शिवसेना वाढविण्यासाठी नव्या आमदारांना संधी देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/