नागरिकत्व कायद्याला विरोध हा भाजपाच्या फायद्याचाच, ‘श्री 420’ हरणार दिल्ली निवडणूक : स्वामी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – नागरिकत्व कायद्यावरून सुरू असलेल्या वादावरून भाजपा नेते आणि राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी विरोधी पक्षांवर जोरदार निशणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, जर विरोध सुरूच राहिला तर त्याचा फायदा निवडणुकीत भाजपाला मिळेल. बहुतांश विरोधी पक्ष नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करत आहेत. यामुळे भाजपाला निवडणुकीत फायदा होणार आहे. जर हा विरोध कायम राहिला तर श्री 420 दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभुत होऊ शकतात.

सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाना साधल्याचे स्पष्ट दिसत आहे. दिल्लीत 8 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर मतमोजणी 11 फेब्रुवारीला होणार आहे.

व्हिक्टोरिया मेमोरियलचे नाव बदलण्याची मागणी
सुब्रमण्यम स्वामी यांनी यापूर्वी कोलकाताच्या व्हिक्टोरिया मेमोरियलचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. स्वामी यांनी रविवारी ट्विट करून म्हटले की, सरकारने कोलकाता पोर्ट ट्रस्टचे नाव बदलल्यानंतर आता व्हिक्टोरिया मेमोरियलचे नाव बदलून राणी झांसी स्मारक महल केले पाहिजे. त्यांनी कोलकाता पोर्ट ट्रस्टचे नाव श्यामा प्रसाद मुखर्जी केल्याने आनंद व्यक्त केला.

स्वामी यांनी ट्विट करून म्हटले की, राणी व्हिक्टोरियाने 1857 मध्ये झांशीच्या राणीच्या बंडानंतर भारतावर कब्जा केला आणि देश 90 वर्षांपर्यंत लूटला. यासाठी त्यांचे नाव मेमोरियलला असू नये.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/