विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी बीडमधून पंकजा मुंडेंऐवजी ‘या’ नेत्याच्या नावाची चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या निकालानंतर राज्यातील सत्ता समीकरणं बदलली आणि जास्त संख्याबल असूनही भाजपला विरोधात बसावे लागले. यामध्ये भाजपात आलेल्या अनेक आयारामांचा पराभव झाला. त्यासोबतच माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना देखील परळी मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला. पंकजा मुंडे यांच्यावर विश्वास ठेऊन भाजपात आलेले सुरेश धस आणि पंकजा मुंडे समर्थकांमध्ये आता वाद होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

बीडची जिल्हा परिषद भाजपला मिळवून देण्यात सुरेश धस यांचे मोठे योगदान होते. पंकजा मुंडे यांचा परळीतून पराभव झाल्याने स्थानिक राजकारणावर देखील याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे. धस हे सध्या विधानपरिषदेचे आमदार आहेत. तर पक्षाकडून पंकजा यांना देखील विधानपरिषदेवर पाठवले जाऊ शकते.

धस यांच्या कार्यकर्त्यांना सध्या आपले नेते विधान परिषदेवर विरोधी पक्षनेते व्हावे अशी स्वप्ने पडू लागली आहेत. तर विधानसभेत स्वतः माजी उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेत्यांच्या बाकावर बसलेले असताना भाजपला विधानपरिषदेवर देखील कणखर विरोधी पक्षनेते पदाची गरज आहे. अशा वेळेस पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत येत असताना धस समर्थक देखील याबाबत आक्रमक असल्याचे समजते. त्यामुळे आता धस आणि मुंडे समर्थकांमध्ये संघर्ष होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Visit : Policenama.com