देवेंद्र फडणवीसांकडून शिवसेनेवर ‘खरमरीत’ टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कालपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी प्रेम असणारे आज मवाळ भूमिका घेत आहेत. सत्तेसाठी किची लाचारी ठेवायची, सत्तेसाठी सौदेबाजीची आवश्यकता नाहीस, अशा शब्दांत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते.

शिवसेनेवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘यापूर्वी सावरकरांविरोधातील विधानांवर शिवसेनेची प्रतिक्रिया कशी जहाल आणि जळजळीत असायची आता मात्र, ती का नरम पडलीय. सत्तेची लाचारीमुळे सौदेबाजी करण्यात येत असून त्यांची सौदेबाजी त्यांना लखलाभ. सत्तेसाठी शिवसेनेला कुठल्या लोकांसोबत तडजोड करावी लागत आहे हे आता स्पष्टपणे दिसून येत आहे. सावरकरांचा अपमान महाराष्ट्र आणि देश कधीही सहन करणार नाही. ‘

राहुल गांधी यांच्या वक्त्यव्याचा निषेध करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला आहे. गांधी हे आडनाव लावून कुणाला गांधी होता येत नाही. राहुल गांधी यांनी केलेलं विधान हे अत्यंत लाजिरवाणं आहे. सावकरांबाबत कदाचीत त्यांना माहिती नाही. बारा वर्ष अंदमानाच्या काळ्या कोठडीत सावरकरांनी ज्या प्रकारच्या अनन्वित अत्याचारांना सहन केलं आहे ते कदाचित देशाच्या इतिहासात कोणीही केलेलं नसेल. राहुल गांधी बारा तासही अशा प्रकारे काळ्या कोठडीत राहू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना सावरकरांबाबत बोलण्याचा अधिकार नाही. ‘

काय म्हणाले होते राहुल गांधी –

काँग्रेस खासदार राहुल गांधींनी ‘रेप इन इंडिया’ वक्तव्यावरुन माफी मागावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. त्यावर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले माझं नाव राहुल सावरकर नाही, गांधी आहे , मी मरेल पण माफी मागणार नाही.रामलीला मैदानावर काँग्रेसच्या ‘भारत बचाव रॅली’दरम्यान ते बोलत होते.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/