देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवार यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी आज (सोमवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतील ‘सिल्वर ओक’ या शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. राज्यात सध्या धनगर, मराठा आणि आता ओबीसी आरक्षणाने रणकंद माजले असताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. आरक्षणाच्या मुद्यावरुन ही भेट होती की आणखी काही दुसरे काही कारण होते याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

देवेंद्र फडणवीस यानी ट्विट करुन शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती दिली आहे. या भेटीची माहिती देताना ही सदिच्छा भेट असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. मात्र, राज्यातील सध्याची स्थिती पाहता या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

‘पवित्र रिश्ता 2’ करण्यास उषा नाडकर्णी यांचा नकार, जाणून घ्या कारण

दरम्यान, आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन सरकारवर निशाणा साधला होता. ओबीसींना मिळालेलं आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकार जबाबदार आहे, असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले.

मुलगा ग्रॅज्युएट झाल्याने माधुरी दिक्षित जाम खुश्श, म्हणाली – ‘राम आणि माझ्यासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट’

 

मी सरकारला मागासवर्ग गठीत करण्याची सूचना केली होती. मार्चपासून जून पर्यंतचा काळ सरकारने वाया घालवला. घटनापीठाने सांगितल्याप्रमाणे करवाई केली नाही, तर आपण आरक्षण वाचवू शकत नाही, असे म्हटले होते. राज्य मागासवर्ग तयार केला असता, तर आपल्याला हे आरक्षण पुनर्स्थापित करता आलं असतं. दुर्दैवाने आमचे मंत्री 15 महिन्याच्या काळात मोर्चे काढण्यात मग्न होते. एकीकडे ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत होता आणि दुसरीकडे मंत्री मोर्चे काढत होते, अशी अवस्था बघायला मिळाली. त्यांनी मोर्चे काढण्याऐवजी केसमध्ये लक्ष घातलं असतं, तर आरक्षण टिकवता आलं असतं, असे म्हणत फडणवीस यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं.

Pune : खेड सभापती विरोधातील अविश्वास ठरावावर आज निर्णय; राजगुरूनगरमध्ये संचारबंदी

 

खळबळजनक ! हुकूमशहा किम जोंग उनचा संताप; बेकायदेशीर CD विकणाऱ्यावर 500 जणांसमोर झाडल्या 12 गोळ्या

पैलवान सुशीलकुमारची दुकानदाराला मारहाण, स्टेडिअममध्ये साहित्य पुरवल्याचे पैसे मागतिल्याने मारहाण झाल्याचा आरोप