‘या’ पक्षाला नेताच नाही तर ते देश कसा चालवणार ? : अमित शहा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्षाला नेताच नाहीये तर ते देश कसा चालवणार आहेत ? असा सवाल भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. कर्नाटकमधील प्रचारसभेत काँग्रेसवर अमित शाह यांनी आज टीकास्त्र सोडले. त्यावेळी त्यांनी बोलतांना त्यांनी हा सवाल उपथित केला.

सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरु आहे. याचदरम्यान कर्नाटकमधील प्रचारसभेत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. त्यावेळी, महामिलावटने देशात सरकार बनविले तरी विविध पक्षांच्या नेत्यांना पंतप्रधान बनविण्यास वेळ लागेल. परंतु, एनडीएचे सर्व पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत आहेत. आमचे सरकार बनल्यानंतर नरेंद्र मोदींच पुन्हा पंतप्रधान बनविण्याचे आम्ही निश्चित केले आहे. आणि दुसरीकडे महाआघाडी आहे. त्यांना नेताच नसल्याने ते देश कसे योग्य पद्धतीने चालवणार आहेत. असे अमित शहा यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, मागील चार महिन्यांपासून मी फिरत आहे. उत्तरेकडून दक्षिण आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे केवळ मोदी-मोदी ही एकच घोषणा ऐकायला येत आहे. असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर, आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला कमी जागा मिळाल्या. त्यावेळी ज्यांना बहुसंख्य जागा मिळाल्या त्यांनी सर्वात कमी जागा मिळलेल्या पक्षाच्या व्यक्तीला मुख्यमंत्री केले. असा टोलाही त्यांनी लगावला.