नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात ‘जागोजागी’ निदर्शने, विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींकडे मागितली ‘मुलाखती’ची वेळ

नवी दिल्ली : वृत्त संस्था – नागरिकत्व दुरुस्ती कायदा २०१९ च्या विरोधात देशभरात निदर्शने आणि हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी देशातील सद्यस्थितीबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना माहिती देण्यासाठी वेळ मागितला आहे.’

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निषेधार्थ देशाभरात आंदोलन सुरू आहे. जामिया मिलिया इस्लामिया जवळील न्यू फ्रेंड्स कॉलनीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा निषेध नोंदवणारे आंदोलनकर्त्यांसह पोलिसांशी चकमक झाली, ज्यात आंदोलकांनी डीटीसीच्या चार बस आणि दोन पोलिसांच्या वाहनांना आग लावली. या चकमकीत विद्यार्थी, पोलिस आणि अग्निशमन दलासह सुमारे ६० जण जखमी झाले. जामिया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या निदर्शनादरम्यान हा गोंधळ उडाला. पोलिसांनी विद्यापीठात प्रवेश केला आणि हिंसाचारात सहभागी असलेल्या बर्‍याच लोकांना ताब्यात घेतलं.

जेएनयू विद्यार्थ्यांचा पोलिस मुख्यालयाबाहेर निषेध :
जामिया स्टुडंट्स युनियनने नागरिकत्व कायद्याच्या निषेधाच्या वेळी झालेल्या हिंसाचारापासून स्वत: ला वेगळे करण्याचे निवेदन जारी केले आहे. विद्यार्थ्यांच्या गटाने असा निषेध केला की, या निदर्शनात बाहेरील व्यक्ती सामील झाले होते ज्यांनी त्यात व्यत्यय आणला. नंतर संध्याकाळी, जवाहरलाल नेहरू (जेएनयू) विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी जामिया विद्यापीठातील पोलिस कारवाई विरोधात मध्य दिल्लीतील पोलिस मुख्यालयाबाहेर निदर्शने केली आणि रात्री उशिरापर्यंत ही भूमिका कायम राहिली.

हिंसाचारानंतर ताबडतोब जामिया मिलिया इस्लामियाचे मुख्य वकील वसीम अहमद खान यांनी रविवारी दावा केला की, दिल्ली पोलिसांनी विना परवानगी विना जबरदस्ती विद्यापीठात प्रवेश केला आणि कर्मचारी व विद्यार्थ्यांना मारहाण केली. त्यांना परिसर सोडून जाण्यास भाग पाडले. कुलगुरू म्हणाले की, हिंसक निदर्शनात त्यांचे विद्यार्थी सहभागी नव्हते.

अलिगड मुस्लिम विद्यापीठात (एएमयू) हिंसाचार सुरूच होता. रविवारी रात्री उशिरा विद्यार्थी आणि पोलिसांत चकमत झाली. दगडफेक व लाठीमारातून ६० विद्यार्थी जखमी झाले. जिल्ह्यात खबरदारी म्हणून इंटरनेट सेवा सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. पोलिसांनी जामिया मिलिया इस्लामियाच्या आवारात प्रवेश केला विद्यापीठाचे दरवाजे बंद केले आहेत, जेणेकरून कॅम्पसमध्ये लपलेल्या ‘बाहेरील’ लोकांना पकडण्यात येईल.

दरम्यान, देशाच्या ईशान्येकडील कित्येक भागात नागरिकत्व कायद्याविरूद्ध निषेध सुरू आहे. काही भागात हिंसाचाराच्या घटनाही घडल्या आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/